चौकट
फलटण तालुक्यातील मागील काही वर्षात झालेल्या व सध्या सुरू असलेल्या रस्ते, बांधकाम, पूल तसेच इतर कामाची त्रयस्थपणे तपासणी करण्याची आवश्यकता असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदार कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे आरपीआय (निकाळजे गट) तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्व कार्यालयाच्या कामकाजामुळे नागरिक हैराण
फलटण प्रतिनिधी :-
फलटण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्व कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्याच्या कामामुळे, पडलेल्या खड्यामुळे, साईड पट्टया विना झालेले रस्ते, रस्ता वर तर पूल खाली अशा सर्व दर्जाहीन कामामुळे नागरिक हैराण झाले असून सातारा जिल्हा बांधकाम विभाग पूर्व चे कार्यकारी अभियंता व संबंधित कर्मचारी मात्र यासर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
फलटण तालुक्यात विविध प्रकारची विकास कामे होत असताना रस्ता, पूल, बांधकाम, रस्ता दुरुस्ती यासर्व कामांचा दर्जा राहिलेला नाही केवळ आर्थिक हितापोटी कामे उरकण्यात येत आहेत. तालुक्यातील रस्ते व पुलाची कामे पहाता संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने कामे करण्यात येत असल्याने कामाचा दर्जा मात्र ढासळलेला दिसत आहे. मागील काही वर्षांत फलटण सार्वजनिक बांधकाम उपविभागात करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची कामे इमारत दुरुस्ती व कार्यालयाच्या विविध दुरुस्ती, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, नवीन रस्ते,नवीन पूल अशा प्रकारची कामे थातूरमातूर पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिक करत आहेत.
फलटण तालुक्यातील झालेल्या अनेक पुलाचे बांधकाम व नवीन रस्ते, रस्ते दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत नियमानुसार रस्त्याच्या कामाचे खोदकाम, दबाई कामाचा दर्जा, त्यावरचे डांबरीकरण ह्या सर्व बाबी नियमानुसार झालेले नाहीत सदरील काम संबंधित कंत्राटदारांनी घाई गर्दी मध्ये उरकली आहेत अशा कामावर नागरिक तक्रारी करत असून सातारा जिल्हा बांधकाम विभाग पूर्व चे कार्यकारी अभियंता व संबंधित कर्मचारी मात्र या कामाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
ग्रामीण भागातील विविध रस्ते, जिल्हा मार्ग हे संबंधित गावांना जोडणारे रस्ते अनेक योजनांमधून या कामासाठी निधी मंजूर केला जातो मात्र सदर रस्ते घाई गर्दीत उरकण्यात आल्यामुळे वर्षभरामधेच रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत तर काही रस्ते वाहून गेले आहेत दिखाऊ कामे करत रस्ते उरकून टाकल्यामुळे वर्षभरातच सदरील रस्त्यावर खड्डे पडलेले दिसून येत असल्याने कामाचा दर्जा मात्र ढासळलेला आहे. काही ठिकाणी करण्यात आलेले पूल हे रस्त्याच्या उंचीपेक्षा खाली करण्यात आले असल्याने रस्ता वर व पूल खाली अशी अवस्था आहे पावसाळ्यात हे पूल पाण्याखाली जात आहेत. काही ठिकाणी साईड पट्टया भरण्यात आल्या नाहीत ज्या ठिकाणी साईड पट्टया भरण्यात आल्या आहेत त्याठिकाणी मुरूम ऐवजी मातीचा वापर करतात आला आहे.काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडी झुडपे वाढली आहेत ती न काढता ग्रामीण भागातील कामे उरकून घेण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सदरील कामे केवळ उरकण्यात आली आहेत.
एकंदरीतच रस्ते असे लगेचच खराब होण्याचे कारण त्यात होणारा भ्रष्टाचारच असल्याची टीका त्यामुळे होत आहे. एकंदरीतच ही सर्व कामे भष्ट्र साखळीने होत असल्याने कोणतीही सुधारणा होण्याची नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जवळपास सर्वच ठेकेदार मनमानेल तशी कामे करत आहेत. त्यात विभागाचे कार्यकारी अभियंते व उपकार्यकारी अभियंते सामिल आहेत. त्यामुळे तक्रारी होऊनही चांगला रस्त होत नाही, हे विशेष. गेल्या काही वर्षांत ठेकेदार व अधिकारी यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून शास्त्रीय पद्धतीने टिकाऊ रस्ते, बांधकाम, पूल तयार करणे तर थांबलेच आहे, पण आता त्यासाठीचे डांबर, खडी, इतर साहित्यही निकृष्ट वापरले जाऊ लागले आहे .
रस्त्यांच्या कामाचे अंदाजपत्रकतयार करणे , निविदा मागवणे , ठेकेदार नियुक्त करणे , त्याच्या कामावर लक्ष ठेवणे , ते खराब होत असेल तर नोटीस काढणे , दंड करणे , काम दर्जेदार करून घेणे ही सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. फलटण तालुक्यातील रस्त्यांची हलक्या पावसानंतरही होणारी अवस्था पाहिल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते नक्की काय करतात हे लक्षात येते. सातारा जिल्हा बांधकाम विभाग पूर्व चे कार्यकारी अभियंता हे तालुक्यातील ढासळलेल्या कामकाजाच्या पद्धतीकडे लक्ष देणार की नेहमीसारखे दुर्लक्ष करत ठेकेदार यांना पाठीशी घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.