फलटण प्रतिनिधी –
सध्या राज्यात महा आघाडीची सत्ता असल्याने हे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत असून एफ .आर. पी.चे तुकडे करण्यासाठी हे राज्य सरकार केंद्र शासनाला शिफारस देत असल्याने महाविकास आघाडी हा कारखानदारांचा पक्ष असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत असून भारत देश कृषिप्रधान असताना फक्त राजकीय पक्ष आपला स्वार्थ साधत असून केंद्र व राज्य सरकार हे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत असून कारखानदारी करणारे कारखान्याचे मालक व पदाधिकारी पक्ष बघत नसून जिकडे सत्ता तिकडे त्यांचा कल असतो अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
उसाला एकरक्कमी एफआरपी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी ‘जागर एफआरपीचा, आराधना शक्तीपीठीची’ या अंतर्गत महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षत्रांसह अनेक ठिकाणी भेटी देत ते शेतकऱ्यांशी ‘एफआरपी’बाबत संवाद साधत असून आज पवारवाडी (आसू) ता. फलटण या ठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी. यासाठी जयसिंगपूर येथे १९ ऑक्टोबर रोजी २० व्या ऊस परिषदेचे आयोजन केले जाणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
दरम्यान राज्यातील ‘एफआरपी’बाबत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राजू शेट्टी हे महाराष्ट्रभर फिरत असून आज शेट्टी पवारवाडी (आसू) याठिकाणी बोलत असताना म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याने ‘एफआरपी’चे तुकडे करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या नीती आयोगाच्या अभ्यासात एफआरपीचे तीन तुकडे करण्यात आले आहेत. तसेच राज्य सरकारनेही नीती आयोगाप्रमाणे एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा अहवाल पाठविला असून ऊसदर देण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष पुढाकार घेत नाही. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. केवळ कारखान्यांचा विचार करून हे धोरण ठरविले जात आहे. त्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटेचा अशा धोरणाला विरोध आहे. दरम्यान शेतकरी उसासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करत असतात, परंतु शेतकऱ्यांना तुकड्याने पैसे मिळाले, तर शेतकरी कर्ज फेडू शकणार नाही. कारखाना हितासाठी शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. शेतकऱ्यांचे पैसे तीन टप्प्यात देऊन शासनाला फक्त कारखानदारांना वाचवायचे असून आपण फक्त त्यांना सत्तेत बसविण्यासाठी पुढाकार घेणार आहोत की काय? असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
तसेच आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो असे निवडणुका आल्यानंतर म्हणणारे आमदार आणि खासदार या विधेयकाला रोखणार का? असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित करत फलटण तालुक्यातील न्यू फलटण शुगर साखरवाडी हा कारखाना दत्त शुगर ने घेतला आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांची बिले न दिल्यामुळे कारखान्याला गाळप परवाना कोणत्या तत्वावर दिला आहे, असा आरोप करत जर कारखाना चालू केला तर शेतकरी संघटना तो कारखाना बंद पडणार असल्याचा इशारा ही शेट्टी यांनी दिला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर, राज्य कार्यकारणी सदस्य अर्जुन साळुंखे, फलटण शहर अध्यक्ष सचिन खानविलकर, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, तालुका अध्यक्ष नितीन यादव, तालुका पक्ष अध्यक्ष दादा जाधव, शिवाजीराव शेडगे यांच्यासह विविध भागातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा आघाडी तालुकाध्यक्ष प्रमोद गाडे यांनी केले.