फलटण दि. १८ : ( फलटण टुडे वृत्तसेवा )
फलटण तालुक्यातील जिंती गावामधील जाणता राजा नवरात्रोत्सव मंडळाकडून जिंती उपकेंद्रातील कोरोना योद्धा आरोग्यसेविका आशा स्वयंसेविका ,अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा सेविकांचे नवदुर्गा म्हणून सन्मान करण्यात आला .गेल्या दोन वर्षांपासून कोरोना जगभरात थैमान असताना आरोग्य सेवितील कर्मचारी जीवाची पर्वा न करता नागरिकांनी सेवा देत होत्या. त्यांच्या माध्यमातून अनेक नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न झाला.व त्यांनी घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य विषयावर चर्चा व माहिती देऊन आपली सेवा देत होत्या. यानिमित्ताने जाणता राजा नवरात्रोत्सव मंडळाने या नवदुर्गाचे साडी-चोळी श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
तसेच नवरात्र उत्सव मंडळ गेल्या २८ वर्षीपासून सामाजिक बांधिलकी जपून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात यशस्वी प्रयत्न करत आहे.जिंती गावामधील कोरोना नंतर डेंग्यूची मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असताना आरोग्य केंद्रातील सेविकांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी प्रयत्न करून डेंग्यूचे रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.यावेळी आरोग्य सेवन साळुंखे म्हणाले शंभर टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. जर गावामध्ये अजूनही कोणाचे लसीकरण झाले नसेलतर त्वरित आम्हाला सांगा. जिल्हा आरोग्य विभागला सहकारी करा लसीकरण पुर्णपणे करून घेऊया. यावेळी आशा सेविका आपल्या भावना व्यक्त करताना गावातील लोकांनी आम्ही केलेल्या कामाची दखल घेऊन केलेल्या सन्मानाने आम्ही कृतज्ञ झाल्याची भावना व्यक्त केली
यावेळी अंगणवाडी सेविका नंदिनी रसाळ, आशा रणवरे, पल्लवी रणवरे, संगिता नरुटे,सुनिता रणवरे, व मदतनीस सुनंदा फडतरे, भाग्यश्री रणवरे, सुनिता रणवरे, संगिता रणवरे, मनिषा रणवरे,वंदना कांबळे तसेच आशा स्वयंसेविका मिना शिंदे वंदना शिखरे, रशिदा तांबोळी, आरोग्य सेविका सविता माने,आरोग्य सेवक दत्तात्रय साळुंखे उपस्थित होते.