भुयारी गटार योजनेच्या स्थगितीस न्यायालयाचा नकार; अशोकराव जाधवांचा तक्रार अर्ज म्हणजे फुसका बार : पांडुरंग गुंजवटे


फलटण( प्रतिनिधी ) 

भुयारी गटार योजना आणि त्यावरील रस्ते कामास स्थगिती मिळण्यासाठी नगरसेवक अशोक जाधव यांंनी उच्च न्यायालयात केलेल्या   तक्रारी अर्जात तथ्य नसल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांंनी फेटाळला असून त्यांचा हा अर्ज म्हणजे फुसका बार ठरलेला असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक पांङूरंग गुंजवटे यांंनी दिली आहे                                    पुढे बोलताना गुंजवटे म्हणाले की , फलटण  नगर परिषदेमधील विरोधी गटनेते तथा नगरसेवक अशोक जाधव यांनी भुयारी गटर योजना व त्यावरील रस्ते कामास स्थगिती मिळणे बाबतचा तक्रारी अर्ज मा. उच्च न्यायालयामध्ये दाखल केला होता.
यासंबंधी उच्च न्यायालयाने मा. जिल्हाधिकारी सातारा यांना सदरच्या  तक्रारी अर्जाबाबतचे सत्य जाणून घेणे बाबत आदेश दिले होते.
या आदेशानुसार
मा. जिल्हाधिकारी यांनी या तक्रारी बाबत संबंधित एजन्सीमार्फत चौकशी करून गटनेते अशोक जाधव यांनी केलेल्या तक्रारी मध्ये कोणतेही तथ्य नसले बाबतच्या  आदेशाचे पत्र नगरसेवक अशोक जाधव व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी  यांना लेखी आदेशान्वये कळविले आहे.
व त्यांनी केलेल्या तक्रारी फेटाळून लावल्या आहेत त्यामुळे अशोक जाधव यांनी केलेल्या तक्रारी अर्ज निकाली काढण्यात आला असल्यामुळे त्यांचा हा अर्ज म्हणजे फुसका बार ठरलेला आहे. फलटण नगरपरिषदेने गेल्या ५ वर्षात महात्वाकांक्षी असा सुमारे सव्वाशे कोटींचा भुयारी गटार योजना प्रकल्प पुर्णत्वास आणला आहे. तसेच कोठ्यावधी रुपयांचे रस्ते मंजूर केलेले आहेत अजूनही अनेक विविध फंङातून विविध विकासकामे सुरु आहेत  फलटण नगरपरिषदेच्या विकासकामांचा खिळ घालणे हेच सुञ गेल्या ५ वर्षात विरोधी पक्षाचे राहिले आहे. एकीकडे तक्रारी अर्ज करणे , ३०८ दाखल करणे आणि दुसरीकडे फलटण चा विकास होत नाही म्हणून कांगावा करणार्या विरोधी पार्टी ला उच्चन्यायालय आणि जिल्हाधिकारी यांनी मोठी चपराक दिलेली आहे यामुळे बोलाचा भात आणि बोलाचीच कढी करणार्या विरोधकांना आगामी नगरपरिषदेच्या निवङणूकीत फलटणकर  नागरीक जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ही पांङूरंग गुंजवटे यांंनी यावेळी व्यक्त केला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!