वाठार निंबाळकर दि. ११ :
वाठार निंबाळकर गावातील जिल्हा आदर्श शिक्षक व तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा संकल्प बुद्धविहार व वाचनालय व पंचशील मित्र मंडळ वाठार निंबाळकर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित वाठार निंबाळकर गावातील शिक्षकांचा सत्कार समारंभ अतिशय रम्य परिसरात व उत्साही वातावरणात संपन्न झाला. संकल्प बुद्धविहार यांचे वतीने गावात वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेतले जातात. यासाठी सुंदर असे व्यासपीठ या ठिकाणी सुरेश मोहिते, सुनील मोहिते, स्वप्नील मोहिते,नितीन मोहिते (बंधू)व सर्व मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ व शिक्षक मित्रपरिवार या उपक्रमात सहभाग घेत आहेत.
वाठार निंबाळकर गावातील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक
गणेश तांबे, तालुका पुरस्कार प्राप्त श्रीमती.प्रमिला निंबाळकर, संजय लाळगे, सचिन भोंगळे, प्रशांत देशपांडे, रोहिणी ढालपे इ.आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. यावेळेस अनेक शिक्षक बांधवांची मनोगते झाली. या मनोगतामध्ये संकल्प बुद्धविहार व वाचनालय तसेच पंचशील मित्र मंडळ वाठार निंबाळकर यांचे वतीने करण्यात आलेल्या सत्कारा बद्दल तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सर्व सदस्यांचे कौतुक केले.व आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी कु. प्राची मोहिते या विद्यार्थिनीने शिक्षकाविषयी सुंदर असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाठार निंबाळकर गावच्या मा.सरपंच सौ.सुवर्णा नंदकुमार नाळे, व प्रमुख पाहुणे विद्यमान उपसरपंच सौ. आनंदीबाई प्रकाश तरटे या उपस्थित होत्या.वाठार निंबाळकर शाळेचे मुख्याध्यापक श्री.कृष्णात कुंभार, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तरटे,प्राथमिक शिक्षक तानाजी वाघमोडे, बिभीषन धोत्रे उपस्थित होते कार्यक्रमाचे सुंदर असे प्रस्ताविक प्राथमिक शिक्षक सचिन ठोंबरे गुरुजी यांनी केले कार्यक्रमाचे आभार सुनील मोहिते यांनी मानले.