फलटण:- मौज झडकबाईची वाडी,ता.फलटण येथे सागर ढाब्यावर फलटण ग्रामीण पोलीसांनी अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकत नऊ जणांना जुगार खेळताना आढळून आले.सदर छाप्यात ३ लाख ८३ हजार ९ रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, ग्रामीण पोलीसांना तानाजी नारायण वाघ (रा. ताथवडा ता.फलटण जि.सातारा) हा झडकबाईची वाडी येथे सागर ढाब्यावर लोकांना जमवून तीन पानी जुगार खेळत आहे अशी माहिती मिळाली असता मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यातील झडकबाईची वाडी येथे सागर ढाब्यावर फलटण ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला असता तीन पानी जुगार खेळताना १) सतीश हनुमंत शिंदे (रा. खटाव, जि सातारा), २)आप्पा लालासाे सालगुडे(रा. सांगवी बारामती, जि पुणे), ३) शहाबुद्दीन यासिन आतार (रा. मुरूम,बारामती जि पुणे), ४) सचिन संपत सोनवणे (रा. मुरूम,बारामती जि पुणे),५) धनाजी शिवाजी जाधव (रा.मिरेवाडी,फलटण जि सातारा), ६) राकेश मच्छिंद्र नवले (रा. सोमेश्वर, बारामती जि पुणे), ७) केशव तात्याबा वाघ (रा.ताथवडा,फलटण जि सातारा), ८) तुळशीराम परशुराम घाडगे(रा. सोमेश्वर, बारामती जि पुणे), ९) तानाजी नारायण वाघ (रा. ताथवडा ता.फलटण जि.सातारा) हे नऊ जण आढळून आले तसेच तानाजी नारायण वाघ याने स्वतःच्या मालकीच्या सागर ढाबा या हॉटेलची इमारत जुगार खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली होती.
सदर छाप्यात जुगाराचे साहीत्य व त्यामध्ये राेख रक्कम, माेटार सायकली व माेबाईल असा ३ लाख ८३ हजार ९ रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. वरील सर्व संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस हवालदार एस.जी.शिंदे करीत आहेत.