फलटण प्रतिनिधी :– फलटण शहर पोलीसांनी गुटखा विरोधात दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकुण १३ लाख ३९ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फलटण शहरामधील नाना पाटील चौक व दहिवडी चौक या ठिकाणी चारचाकी क्रमांक एम. एच.१०. बीएफ . ७८७८ व गाडी क्रमांक एम.एच ०४ सी.जे. ५४८३ ही गाडयामधुन महाराष्ट्रामध्ये प्रतीबंधीत नावचा गुटखा , पान मसाला , सुगंधीत तंबाखु इतर गुटखा गाडयामधुन वाहतुक होणार आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळाली असता नाना पाटील चौक येथे एक पथक तर दहिवडी चौक येथे दुसरे पथक यांच्यासह सापळा लावला असता माहिती मिळालेली एक संशयीत गाडी नाना पाटील चौक दिशेकडुन आली असता गाडीमध्ये समिर खानसाहेब आत्तार व संग्रामसिंह ज्ञानदेव बरकडे दोन्ही (रा . जावळी ता.फलटण जि . सातारा) असे दोघेजण गाडीत होते सदर गाडीची पोलीसांनी तपासणी केली असता गाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतीबंधीत असणारे प्रतिबंधीत अन्न पदार्थ यामध्ये विमल नावचा गुटखा , पान मसाला , सुगंधीत तंबाखू व इतर गुटखा आढळून आले.
दुसऱ्या घटनेत दहिवडी चौक या ठिकाणी दुसरी चारचाकी गाडी क्रमांक एम.एच ०४. सी.जं. ५४८३ ही संशयीत गाडी कोळकी कडुन दहिवडी चौक या दिशेकडे आली असता ही गाडी पोलीस कर्मचारी यांनी ही गाडी थांबवली असता गाडीमध्ये महेंद्र आगमोगम कुंडबर ऊर्फ आण्णा (रा. लक्ष्मीनगर फलटण ता . फलटण जि . सातारा) होता. या गाडीची पोलीस कर्मचारी यांनी झडती घेतली असता गाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतीबंधीत असणारे प्रतिबंधीत अन्न पदार्थ यामध्ये विमल नावचा गुटखा , पान मसाला , सुगंधीत तंबाखु इतर गुटखा ) हे मिळुन आले.
सदर कारवाईत एकुण १३ लाख ३९ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला . सदर बाबत अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सातारा विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी विकास रोहिदास सोणवने यांनी फिर्याद दाखल केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे हे करीत आहेत .सदर कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे , पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि नवनाथ गायकवाड, पो.ना.शरद तांबे, पोहवा चंद्रकांत धापते , पो.हवा . रमेश फरांदे , म.पो.हवा अनिता पानसरे, पांना अशोक वाडकर , पोकों सुजित मँगवाडे, पो.कॉ. अधुत जगताप यांनी केली.
Good Job… 👌👍