औरंगाबाद (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
जागतिक शिक्षक दिनी औरंगाबाद महानगरपालिकेतील उपक्रमशील, आदर्श शिक्षक श्री. मनोज अग्रवाल यांनी लिहिलेल्या चैतन्यवेल कवितासंग्रहाचे उत्साहात प्रकाशन करण्यात आले.वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य या समूहातर्फे चैतन्यवेल कवितासंग्रह प्रकाशन व राज्यस्तरीय वाचनयात्री पुरस्कार वितरण कार्यक्रम मौलाना आझाद संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रख्यात कवी, गीतकार डॉ. दासू वैद्य यांनी भूषविले. मानवी जीवनरूपी वेल चैतन्याने,उत्साहाने बहरावी व निराश मनाला प्रसन्नता, ऊर्जा लाभावी हा विचार चैतन्यवेल कवितासंग्रहातून श्री. मनोज अग्रवाल यांनी दिलेला आहे.वाचनयात्री पुरस्काराचे सत्कारमूर्ती श्री. गणेश तांबे (सातारा)हे होते. हा पुरस्कार प्राप्त झाल्याने मनस्वी आनन्द झाल्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. पुस्तक प्रकाशन सोहळ्यास
प्रमुख अतिथीच्या रूपाने मनपा उपायुक्त डॉ. संतोष टेंगले, मनपा शिक्षणाधिकारी श्री. रामनाथ थोरे, मनपा सांस्कृतिक अधिकारी श्री. संजीव सोनार, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विशाल तायडे,श्रीमती प्रिया सिंग, श्री. देवेंद्र सोळंके ,श्री. जगदिश अग्रवाल,श्री. दीपक अग्रवाल, श्री. भारत तिनगोटे लाभले.वाचनसाखळी समूहाच्या संयोजिका मा.श्रीमती प्रतिभा लोखंडे मॅडम व सह संयोजिका श्रीमती प्रतिभा टेमकर मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. श्री. कचरू चांभारे, श्रीमती कांता सोनवणे, श्री. योगेश आहेर, श्री. वशिष्ट लोकरे, श्री. दीपक पडोळ,श्री. गोविंद कुलकर्णी, श्रीमती पूनम गुजर, श्रीमती अंजली दीक्षित,ऋषिकेश गोरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती प्रतिभा लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विद्युलता पवार यांनी केले व उपस्थितांचे आभार श्रीमती प्रतिभा टेमकर यांनी मानले.