फलटण (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
‘रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे’ असे विचार मेजर संदीप शेंडगे यांनी व्यक्त केले. फलटण तालुक्यातील खटकेवस्ती येथे सामाजिक उद्देशाने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘एकदंताय’ या सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी शेंडगे बोलत होते. . धर्मादाय आयुक्तांकडे नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या ‘ एकदंताय ‘ सामाजिक विकास संस्थेच्या नामफलकाचे मेजर संदीप शेंडगे यांच्या हस्ते फित कापून अनावरण करण्यात आले. भारतीय सैन्यदलात सेवा पूर्ण करून नुकतेच परतलेल्या सरडे ( ता.फलटण) येथील मेजर संदीप शेंडगे यांचा संस्थेच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला . राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांचे जयंतीचे औचित्य साधून २ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी ७५ रक्त बाटल्या रक्त जमा झाले. तसेच यावेळी सायकलिंग प्शुशप दोरीवरील उड्या विविध क्षेत्रातील कामगिरी बद्दल गोखळीच्या कु.स्वरा भागवत या चिमुकलीचा शाल, श्रीफळ, वृक्ष, पुष्पहार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी श्री.गणेश यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी खटकेवस्ती चे सरपंच बापूराव गावडे , तंटामुक्तीचे अध्यक्ष बजरंग नाना खटके, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष पै. बजरंग गावडे, गोखळी चे माजी सरपंच नंदकुमार गावडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील, पोलीस पाटील विकास शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव, खटकेवस्तीचे उपसरपंच योगेश गावडे पाटील, संतोष खटके,बाॅडी बिल्डर जगदीशभैया मदने, हनुमान दहिहंडी संघाचे अध्यक्ष योगेश भागवत उपस्थित होते. यावेळी पै. बजरंग गावडे, बजरंग खटके बापूराव गावडे, नंदकुमार गावडे, मेजर संदीप शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले .
स्वागत राधेश्याम जाधव यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे अध्यक्ष सागर चव्हाण, उपाध्यक्ष आकाश घाडगे, सचिव सुनील चव्हाण, खजिनदार विकास गायकवाड तसेच विशाल घाडगे ,निखिल गायकवाड ,पप्पू गायकवाड, अक्षय चव्हाण, राकेश चव्हाण यांनी स्वागत केले
रक्तदान शिबिरासाठी ‘ तर्पण ‘ ब्लॅड सेंटर पुणे, शाखा बारामती यांचे डाॅक्टर आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.