गोखळी : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील राजाळे येथील रहिवासी चित्रकार, कलाशिक्षक राहुल भालेराव यांना आर्ट बिट्स फाउंडेशन पुणे, महाराष्ट्र यांच्याकडून देण्यात येणारा गुरु गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2021 हा जाहीर झाला आहे दरवर्षी जून जुलै दरम्यान या पुरस्काराची घोषणा केली जाते. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या राहुल यांनी कलेचे शिक्षण घेऊन आपल्या रंग कुंचल्याने कलाकृती साकार करून अनेकांची मने जिंकली आहेत वेगवेगळ्या माध्यमातून निसर्ग चित्रे, पेन्सिल ड्रॉईंग, पोर्ट्रेट रांगोळी,गालीच्या तसेच कॅनव्हास पेंटिंग मध्ये त्यांचा हातखंडा आहे. अनेक ठिकाणी त्यांची चित्र प्रदर्शने भरविली असून ते विद्यार्थ्यांना विविध कलेतील स्पर्धांचे मार्गदर्शन करत आहेत.सध्या बामणोली ता.जावली आश्रम शाळेत कार्यरत आहेत.यापूर्वी पालघर जिल्हा वसई भाताने आश्रम शाळेत काम केले आहे. त्यांना ज्ञानवर्धनि गोप रहिमतपूर राज्यस्तरीय स्पर्धा २००३, उपक्रमशील कलाध्यापक आंबेजोगाई, मानवता प्रतिष्ठान पुणे, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार २०२०, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्यस्तरीय” गुणवंत शिक्षक पुरस्कार” कोकण विभाग आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात यश संपादन करत असून कलाक्षेत्रातील त्यांच्या या यशाबद्दल प्रकल्प अधिकारी डहाणू श्री. अशिमा मित्तल (भा.प्र. से.) मॅडम शाळेच्या प्राचार्य श्रीम.अंजली श्रीराव व शाळेतील सर्व शिक्षक वृंद ग्रामस्थ व मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे