जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
गुणवत्ता व दर्जा च्या जोरावर व वेळेत महावितरण कंपनीला विद्युत ठेकेदार म्हणून सेवा देणारी कंपनी ‘संदीपा पावर लाइन्स’ चे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथील 33 केव्ही सबस्टेशन च्या उदघाटन प्रसंगी मनोगत मध्ये प्राजक्त तनपुरे यांनी गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील,अभिजित तांबिले,पंचायत समिती सदस्या सारिका लोंढे,भादलवाडी ग्रामपंच्यात सरपंच शिवाजी कण्हेरकर ,महावितरण चे प्रदेशीक संचालक अंकुश नाळे, बारामती परिमंडळ चे मुख्य अभियंता सुनील पावडे,बारामती ग्रामीण मंडळ चे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील,कार्यकारी अभियंता गणेश लटपटे,उप कार्यकारी अभियंता मोहन सुळ,विद्युत नियंत्रण समिती चे सदस्य प्रवीण शिंदे व अधिकारी,कर्मचारी व नागरिक उपस्तीत होते
दिलेल्या मुदती च्या आत सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून सदर 33 केव्ही सबस्टेशन दर्जात्मक बांधून व विद्युत पुरवठा सुरू करून महावितरण कडे ताबा दिला या बदल ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते संदीपा पावर लाइन्स चे संचालक अजिंक्य संदीप मेनसे यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी संदीपा पावर लाइन्स यांच्या वतीने महापुरुषाच्या जीवनावरील पुस्तके मान्यवरांना देण्यात आली.
——————————-