बारामती:
कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहर उपाध्यक्ष नवनाथ राघू चौधर यांच्या वतीने कर्जत जामखेड येथील शाळकरी विद्यार्थ्यां साठी वह्या व पेन चे वाटप करण्यात आले
आमदार रोहित पवार यांच्या आव्हान नुसार वाढदिवस चा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात आला आहे.या प्रसंगी डॉ सुजित अडसूळ,डॉ रमेश भोईटे,गजानन चौधर ,बाळा चौधर ,भैय्या कांबळे,साईनाथ चौधर आदी उपस्तीत होते.
नवनाथ चौधर यांचे कार्य कौतुकास्पद असून सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान असून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावे असेही रोहित पवार यांनी सांगितले
——————————