अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण मध्ये "अभियंता दिवस" उत्साहात साजरा

फलटण ( फलटण टुडे वृत्तसेवा ) : 
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटणच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने ‘लायन्स क्लब’ फलटण आणि ‘बिल्डर असोसिएशन’ फलटण यांच्या सौजन्याने शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी ‘अभियंता दिवस’ व ‘विश्वकर्मा दिन’ साजरा केला. कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करुन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सदरच्या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून श्री इंद्रजीत नागेशकर, सिव्हिल इंजिनिअर आणि आर्किटेक्ट, कोल्हापूर उपस्थित होते. तसेच श्री अरविंद निकम, प्रशासकीय अधिकारी फ.ए. सो, फलटण, MJF Lion भोजराज नाईक निंबाळकर, इंटरनॅशनल लायन्स क्लब द्वितीय उपप्रांतपाल, Lion रणधीर भोईटे, चेअरमन बी.ए.आय महाराष्ट्र राज्य, श्री शफिक मोदी, चेअरमन बी.ए.आय फलटण, प्रसन्न कुलकर्णी, अध्यक्ष लायन्स क्लब फलटण आणि प्राचार्य, श्री मिलिंद नातू उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व विश्वकर्मा आणि विश्वेश्वरया यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक MJF Lion भोजराज नाईक निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री इंद्रजीत नागेशकर यांनी, अभियंता दिवस हा भारताच्या जडणघडणीमध्ये अभियंता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो असे सांगितले. तसेच त्यांनी “पौराणिक वास्तू आणि त्यांचे जतन” या विषयावरती उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते पुढे बोलताना म्हटले की पौराणिक वस्तू आणि संस्कृती यांना आधुनिकतेची जोड देऊन त्यांना जतन व पुनर्जीवित केले पाहिजे. फलटण हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. हा वारसा कायमस्वरूपी जपण्याचे येथील तरुण अभियंत्यासमोर आव्हान असल्याचे ते म्हटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख सौ धनश्री भोईटे, स्थापत्य विभाग प्रमुख यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्राचार्य श्री मिलिंद नातू सर यांनी केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!