बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ):
तब्बल 10 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२१ परीक्षा दिली. त्यामधून आदित्य चा देशात (ऑल इंडिया रँक) 2383 वा क्रमांक आला.
आदित्य निकम हा आचार्य ॲकॅडमीच्या पहिल्या इंटिग्रेटेड बॅच चा विद्यार्थी आहे. पहिल्याच प्रयत्नात एवढा उत्तम निकाल लागल्या बद्दल आदित्य , त्याचे आई वडील आणि आचार्य ॲकॅडमी मधील त्याचे शिक्षक सर्वच खूप आनंदी झाले.
आदित्य निकम याचे वडील काॅसमाॅस बँकेत नोकरी करतात. त्यांची नेहमी दर तीन वर्षाला बदली होत असते.इयत्ता पहिली ते पाचवी तो कोल्हापूर इथे शिकला नंतर सहावी ते दहावी बारामती मधील विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर मध्ये एस एस सी बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण झाला . दहावीला त्याला 86% मार्क्स होते.
अकरावी साठी त्याने आचार्य ॲकॅडमी मध्ये दोन वर्षांच्या इंटिग्रेटेड कोर्स साठी प्रवेश घेतला.अगदी पहिल्याच दिवसापासून त्याने जेईई मेन , जेईई ऍडव्हान्स साठी चिकाटीने अभ्यास करायला सुरूवात केली.आचार्य ॲकॅडमी प्राध्यापकांकडून प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान घेत त्याने अभ्यास चालू ठेवला.छोट्यातील छोटी अभ्यासात राहिलेली त्रुटी त्याने प्राध्यापकांकडून दूर करून घेतल्या.
जेईई मेन 2021 च्या प्रत्येक परीक्षेत त्याने 99 च्या वर परसेंटाइल मिळवले.त्याचा सरासरी निकाल हा 99.80 परसेंटाइल आला.
देशातील रॅन्क 2383 इतका आला.
आदित्य ची स्वत:ची जिद्द, पालकांची जागरुकता व आचार्य ॲकॅडमी बारामती येथील प्राध्यापकांचे मार्गदर्शन या त्रिवेणी संगमातून त्याने हे उज्ज्वल यश संपादन केले आहे.
आचार्य ॲकॅडमी चे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर मुटकुळे सर, संचालक सुमित सिनगारे सर , संचालक कमलाकर टेकवडे सर , संचालक प्रवीण ढवळे सर यांनी आदित्य च्या यशाचे कौतुक केले