कोरेगाव तालुक्यातील सन 2021 मधील तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प.शाळा जाधववाडी शाळेतील उपशिक्षक श्री. सचिन मोहनराव भोंगळे यांना मानसिंगराव जगदाळे सभापती शिक्षण व क्रिडा समिती जि.प.सातारा,राजाभाऊ जगदाळे सभापती पं.स.कोरेगाव, सजंय साळुंखे उपसभापती पं.स.कोरेगाव, मंगल गंगावणे पं.स.सदस्य कोरेगाव, क्रांती बोराटे गटविकास अधिकारी प.स.कोरेगाव, धनंजय चोपडे शिक्षणाधिकारी जि.प. सातारा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सचिन भोंगळे फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावचे रहिवासी. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे.
सचिन भोंगळे यांनी त्यांच्या एकूण शैक्षणिक वाटचालीमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षक पेशा धारण करून भारताची आदर्श पिढी घडवण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे केलेले आहे. शिष्यवृत्ती मार्गदर्शन,शैक्षणिक उठाव, क्रीडास्पर्धा,तंत्रस्नेही शिक्षक, कोरोना काळातील कामकाज इ.त्यांचे उल्लेखनीय काम आहे.
सचिन भोंगळे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.