फलटण ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :निंबोरे येथील जि.प.शाळा,मदने नायकुडे वस्ती, येथिल अंगणवाडी सेविका रुपाली विजय अडसूळ यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
राज्यातील सर्व शिक्षक एकत्र येत ‘शिक्षक ध्येय’ तर्फे या नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील हेतू होता.
या स्पर्धेसाठी रूपाली विजय अडसूळ यांनी *’पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांचा विकास घडवूया’* हा उपक्रम सादर केला होता. त्यांच्या या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड होऊन त्यांना कर्तृत्ववान शिक्षक हा पुरस्कार देण्यात आला.
मूल हे ज्ञानाचा निर्मीता असल्याने त्यांना विविधांगी नवोपक्रम राबवून त्यांना शैक्षणिक, समाजिक, आर्थिक, विकासा बरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून मूलाची खरी शिक्षणाची मुहूर्तमेढ घालण्याचे काम या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक तारळकर सर,शा. व्य.स.अध्यक्ष गणेश मदने, सदस्य,ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,ग्रामस्थ तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पर्यवेक्षीका शिंगाडे मँडम इ.
या यशाबद्दल त्यांचे यांनी अभिनंदन केले आहे. त्यांना या कार्यात मुख्या. शिक्षक, पालक,विद्यार्थी,परिवारातील सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.