तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी या मोबाईल अॅपव्दारे अँड्रॉईड मोबाईल मध्ये रजिस्ट्रेशन करुन आपल्या मालकीच्या शेतजमिनीची पीक पाहणी स्वतः अॅपवर करावी असे आवाहन तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे.
महसुल व वनविभाग यांचेकडील दिनांक ३०/७/२०२१ या शासन निर्णयान्वये महसुल विभागाने ई – पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी संपुर्ण राज्यात करणेबाबत दिशानिर्देश देणेत आलेले आहेत . ई – पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत शेतक – यांनी ई – पीक पाहणी या मोबाईल अॅपव्दारे अँड्रॉईड मोबाईल मध्ये रजिस्ट्रेशन करुन आपल्या मालकीच्या शेतजमिनीची पीक पाहणी स्वतः अॅपवर नोंदवावयाची आहे तसेच पिकांचे फोटो अपलोड करावयाचे आहेत.ई – पीक पाहणी दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासुन संपुर्ण राज्यात राबविण्यात येईल.तसेच याबाबत प्रत्येक गावात तलाठी मंडलाधिकारी यांचे मार्फत शेतक – यांना माहिती देण्याचे काम चालु आहे.ई – पीक पाहणीचे डेमो अॅपसाठी पुढील लिंक उपलब्ध आहे . http://epeek.mahabhumi.gov.in/demo/app-download या लिंकवर जाऊन डाऊनलोड करावे असे आवाहन तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे.