.
बारामती :
महावितरण कंपनीच्या वेतन करारात लाईन स्टाफला मंजूर वाढीव इंधन भत्ता लागू करावा यासाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन बारामती यांच्या वतीने उर्जा भवन बारामती येथील परिमंडल कार्यालया समोर सोमवार दि ९ ऑगस्ट रोनी निषेध बॕनर आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी वि.क्षे.तां.का.युनियनचे परिमंडळ सचिव दत्तात्रय माहुरकर व
ग्रामीण मंडल अध्यक्ष धनाजी तावरे उपाध्यक्ष विनोद तावरे, सचिव राजेंद्र देहाडे,दत्ता खुडे संघटनेचे बारामती विभाग अध्यक्ष संतोष पवार, सचिव अनंत सावंत तसेच ज्ञानेश्वर सावंत ,वसंत कुंभार,मधुकर लगड ,छगन आडके, सचिन वाल्मीकि, राजेंद्र झिंजाडे, सचिन माने, सचिन गोसावी, सागर वाघमोडे ,मनोज मडावी, प्रवीण भरते ,अमोल गावडे,दीपक खंडागळे, केडगाव विभाग मच्छिंद्र बारवकर, गोरक्ष बारवकर, उत्तम गायकवाड, दत्ता तावरे, बापूराव नरूटे, कांतीलाल मेरगळ, सचिन खोमणे, सासवड विभाग आवाळे, जालन, साळुंखे, काकडे, उमाप, बोरावके, इत्यादी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
आंदोलनाची जर महावितरण व्यवस्थापन दखल घेत नसेल, व लाईन स्टाॕफला मंजूर वाढीव इंधन भत्ता लागू करत नसेल, तर लगतच्या भविष्यात आंदोलनचा दुसरा टप्पा म्हणजे वाहन बंद आंदोलन केले जाईल असेही माहुरकर यांनी सांगितले. या वेळी प्रशासन विरोधात घोषणा देण्यात आल्या