एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर सुरू केली चहा टपरी

एकता ग्रुप च्या माध्यमातून चहा नाष्टा

लालपरी चे उदघाटन प्रसंगी एसटी कर्मचारी
बारामती दि. १३ :
प्रवाश्यांच्या सेवेसाठी सुरू झालेली लालपरी म्हणजेच एसटी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडत असल्याने महिन्याचे कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा वेळेवर होत नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बारामती बस स्थानक समोर चहा व नाश्त्या चा व्यवसाय सुरू केला आहे.
गेल्या पंधरा वर्षा पासून एसटी आर्थिक संकटात आहे व कोरोना मुळे आता पगार सुद्धा वेळेवर होत नाही व इतर आर्थिक लाभ सुद्धा मिळत नाही त्यामुळे कुटूंब चालविणे कर्मचाऱ्यांना अवघड होतं असल्याने बारामती एसटी बस स्थानक,विभागीय कार्यशाळा,एमआयडीसी आगार या मधील दोनशे कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एकता ग्रुप संस्था स्थापन करून ‘लालपरी ‘ नावाने स्टॉल उभा करून चहा व नाष्टा ची सोय नागरिक व कर्मचारी,प्रवाश्या साठी सुरू केली आहे.प्रत्येकाने या मध्ये आर्थिक योगदान दिले आहे व ड्युटी च्या अलोकेशन प्रमाणे नेमून दिलेले कर्मचारी स्टॉल वर काम करणार आहेत,पदार्थ बनवून देणे,विकणे,कच्चा माल विकत आणणे आदी जवाबदारी ठरवून दिलेले कर्मचारी करणार असून 
या नंतर विभागीय कार्यशाळा,एमआयडीसी आगार,पेन्सील चौक व बारामती मधील अनेक ठिकाणी आशा प्रकारचे फिरते खाद्यपदार्थ स्टॅल उभे केले जाणार असून त्या ठिकाणी इतर कर्मचारी यांची नेमणूक केली जाणार आहे. या मधून कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणे हा मुख्य उद्देश्य असला तरी महामंडळ ने नेमून दिलेली कोणतेही ड्युटीवर कर्मचारी यांनी 
गैरहजर राहता कामा नये व महामंडळ चे नुकसान होऊ नये  अशी सुद्धा अट यामध्ये आहे.गुणवत्ता व दर्जा इतर व्यवसाईक पेक्षा  उत्तम असावा या साठी ‘आचारी ‘ एसटी च्या बाहेरील आहे.
एसटी कर्मचारी पूर्ण पणे एसटी वर अवलंबून आहे परंतु या पुढे एसटी चे खाजकीकरण होऊ शकते किंवा आर्थिक दृष्टया कर्मचारी कमकुवत होऊ शकतो शासनास व विविध संघटना याना कर्मचाऱ्यांचे  काही देणे घेणे नाही त्यामुळे प्रत्येक कर्मचारी यांनी सामूहिक किंवा वैयक्तिक व्यवसाय एसटी ची सेवा करत केले पाहिजे तरच कर्मचारी व कुटूंब जगू शकते अन्यथा इतर कर्मचारी यांनी जशी आत्महत्या केली तशी करावी लागू नये म्हणून वेळीच सावध व्हा असा इशारा अनेक निवृत्त कर्मचारी यांनी सदर कार्यरत कर्मचाऱ्यांना दिला आहे.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!