आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर कडून पूरग्रस्तांना मदत

वाठार निं. दि.१३ :
श्री.रवींद्रकुमार लटिंगे प्राथमिक शिक्षक वाई यांनी केलेल्या अहवानानुसार,एक हात मदतीचा,आधार आपल्या दातृत्वाचा यानुसार अतिवृष्टीमुळे कोंढावळे ता.वाई जि.सातारा येथील डोंगर पायथ्याशी असणाऱ्या देवरुखवाडीतील सहा -सात घरांवर दरड कोसळली आणि बिकट प्रसंग उद्भवला.त्यामुळे सदर कुटूंबे बेसहारा झाली असून त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक वस्तूंची गरज भासत असल्याने तसेच समाजभान जपून खारीचा वाटा उचलून हातभार लावत आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर या सामाजिक संस्थेने तसेच यश कन्ट्रक्शनचे आदरणीय राजीव साहेब नाईक-निंबाळकर व स्वामी हॉस्पिटलचे आदरणीय डॉ.रविंद्र बिचुकले-शिंदे सर (M.S)यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण पासून 110 k.mअंतर जाऊन प्रत्यक्ष त्या गावात१५ जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.गतवर्षी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्येही आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर या संस्थेने मदत केली होती.
या प्रसंगी कोंडावळे शाळेचे श्री.रवींद्र लटिंगे सर, दिपक भुजबळ सर, नितीन जाधव सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!