सातारा दि. 15 (जिमाका) : जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटी रेट 10 पेक्षा कमी असल्यने जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रामपंचायत स्तरावर कोविड प्रतिबंधात्मक खालील अटी व शर्तींचे अधिन राहून ऑफलाईन ग्रामसभांचे आयोजन करण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
ग्रामसभा कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सक्तीने मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक राहील. यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सॅनिटायझर उपलब्ध ठेवावे. हस्तांदोलन व धुम्रपान करण्यास सक्त मनाई राहील. ग्रामसभेच्या कार्यक्रमामध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान 01 मीटर सामाजिक अंतर राहील. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करणार आहेत त्या ठिकाणच्या हॉलमध्ये ग्रामसभेपूर्वी व ग्रामसभा संपल्यानंतर संपूर्ण सॅनिटायझेशन करणे बंधनकारक राहील. महाराष्ट्र शासनाकडील सूचननेनुसार सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारची धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बदं असल्याने कोणत्याही परिस्थितीत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यास मनाई राहील. आजारी असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत ग्रामसभेमध्ये प्रवेश देण्यात येवू नये. ग्रामसभेचे ठिकाण कन्टेंमेंट झोन मध्ये मोडत असल्यास त्या ठिकाणी संबंधित उपविभागीय अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंनकारक राहील. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले कोविड विषयक सूचनांचे तंतोतंत पालन करणे आयोजकांवर बंनकारक राहील.
वरील नमूद अटी व शर्तींचा भंग केल्यास संबंधितांविरध्द साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कठोर कारदेशीर कारवाई करण्यात येईल.