सातारा दि. 5 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास (घरकुल) योजना सुरु करण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनु. जतीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून लाभार्थ्याच्या स्वत:च्या जागेवरअथवा कच्चया घराच्या ठिकाणी पक्के घर देणे हा योजनेचा मुळ उद्देश आहे.
पात्र लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे आणि शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांनी संबंधित नगरपरिषद, नगरपंचायतीकडे संपर्क करावा अधिक माहितीसाठी नितीन उबाळे, सहायक आयुक्त, समाज कलयाण, सातारा दूरध्वनी क्र. – 02162-298106 येथे संपर्क साधावा .