सातारा दि.6 (जिमाका): राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळवळणास येणाऱ्या अडचणींमुळे दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) घेण्यात येणारी परीक्षा दि. 12 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येईल. तसेच यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. 12 ऑगस्ट रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल असे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रभावती कोळेकर यांनी कळविले आहे.