सातारा दि.9 (जिमाका): नवीन शिधावाटपदुकान मंजूर करण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करुन दिलेला आहे. शासनाच्या प्राथम्यक्रमानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्यांच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.
जाहीरनामे प्रसिद्ध केलेल्या देय दुकानांची संख्या पुढीलप्रमाणे. सातारा-3,कोरेगाव-19, जावली-12, वाई-17, खंडाळा-14,महाबळेश्वर-22,पाटण-