फलटण प्रतिनिधी :- आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढाव्यात व काँग्रेस कार्यकर्त्यांना पुर्ण ताकद दिली जाईल अशी ग्वाही दिली करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
हाँटेल आर्यमान येथे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेसचे नेते,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी तालुका काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार तालुकाध्यक्ष श्री. महेंद्र सूर्यवंशी बेडके यांच्या हस्ते करण्यात आला.
तालुक्यातील विविध विषयावर त्याच बरोबर शहरातील आरोग्य,रस्ते,गटारे, तसेच शहरात वाढणारा कोरोना रोगाचा प्रादुर्भाव,उपाययोजना, मलठण येथील प्रलंबित पोलीस चौकी, आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली .लवकर याबाबत प्रशासन यांना सोबत घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष पंकज पवार, जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, अनू.जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ दैठणकर,तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे,युवक चे तालुकाध्यक्ष अजिंक्य कदम अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष ताजूद्दीन बागवान, शहराध्यक्ष अल्ताफ पठाण,अनू.जाती सेलचे तालुकाध्यक्ष अतुल कांबळे, उपाध्यक्ष मोहित बार्शीकर,तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते नितीन जाधव, बेंद्रे सर,सोपानराव जाधव,ठोंबरे सर उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय फलटण पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष प्रा. रमेश आढाव व उपाध्यक्ष युवराज पवार व सदस्य यशवंत खलाटे, शक्ति भोसले, प्रशांत रणवरे यांचा सत्कार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
फलटण :- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वागत करताना काँग्रेसचे पदाधिकारी