डॉ.सायली गोरे हिच्याकडे पाहून एवढंच म्हणावंसं वाटतं,
“खुदी को कर बुलंद इतना की,
हर तकदीर से पहले
खुदा बंदे से खुद पुछे
बता तेरी रजा क्या है!
डॉ.सायलीच्या वाढदिवसानिमित्त सायलीच्या भावी आयुष्यात अशीच यशाची उत्तुंग शिखरे सर व्हावीत हीच अपेक्षा व सायलीला उदंड आयुष्याच्या अनंत हार्दिक शुभेच्छा!!!
जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास म्हणजेच डॉ.सायली अनिता गोरखनाथ गोरे.
शांत, संयमी,आज्ञाधारक,जिद्द चिकाटी,आत्मविश्वास,कष्टाळू, अशा आमच्या लाडक्या डॉ.सायली गोरे (दिदू)हिचा आज वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा त्यानिमित्ताने तिच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला एक आढावा…
“असाध्य ते साध्य
करिता सायास
कारण अभ्यास”
ही संत तुकोबांची शिकवण कु.डॉ.सायली अनिता गोरखनाथ गोरे हिला हुबेहूब लागू पडते.एखादी गोष्ट मनावर घेतली की,ती सत्यात कशी उतरायची ही गोरे कुटुंबीयांकडून शिकण्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉ.सायली गोरे होय.
बोराटवाडी ता.माण हे सायलीचे गाव. आई-वडील दोघेही शिक्षक वाई सारख्या दुर्गम भागामध्ये आजही अखंड ज्ञानदानाचे पवित्र काम करत असताना श्री.गोरखनाथ गोरे व सौ.अनिता गोरे आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांनाच दैवत मानून ज्ञानदानाचे कार्य करणारे हे दाम्पत्य यांचे असंख्य विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चमकताना दिसतात. त्यांच्या या प्रामाणिक शिकवणीमुळे त्यांचीही दोन्ही मुले पहिल्यापासूनच विविध परीक्षेत चमकताना दिसून आली. आज सौरभ हा इंजिनिअरिंग तर सायली ही सोलापूर येथे एम.बी.बी.एस शिक्षण पूर्ण करत आहे.
सौ.अनिता गोरे या आदर्श व उपक्रमशील प्राथमिक शिक्षिका त्यांनी स्वतः कार्यरत असणाऱ्या जि.प.शाळेतच हि दोन्ही मुले शिकवली. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, सैनिक परीक्षा या सर्व परिक्षा उत्कृष्ट गुणांनी पास झालेली ही दोन्ही मुले आज विविध क्षेत्रात चमकताना दिसत आहेत.
जे लोक डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहतात,आणि डोळे मिटेपर्यंत स्वप्नाचा पाठलाग करतात,त्यांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपड असतात.काही स्वप्ने ही वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात हे डॉ.सायली गोरे हिच्याकडे पाहून समजते.
डॉ.सायली हि लहानपणापासूनच अत्यंत हुशार,भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धेत मोठमोठ्या ढाली बक्षीस स्वरूपात घरामध्ये घेऊन यायची, माध्यमिक विद्यालयात संपूर्ण शाळेत सर्वात जास्त गुण मिळाल्याबद्दल तिच्या हस्ते शाळेचे ध्वजारोहणही करण्यात आले.ही खूप मोठी अभिमानास्पद बाब आहे.
डॉ.सायली गोरे हिने अपार कष्ट करून जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या बळावर
NEET परीक्षेमध्ये 560 गुण मिळवून एम.बी.बी.एस ला सोलापूर येथे प्रवेश मिळवला. मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेते,आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करते ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. डॉ.सायली गोरे ही निश्चितच वैद्यकीय क्षेत्राबरोबरच स्पर्धा परीक्षेत सुद्धा नाव चमकवेल यात शंका नाही.याचे सर्व श्रेय तिच्या आई-वडिलांना, त्यांच्या अपार कष्टाला, त्यागाला जात आहे.
श्री.गणेश तांबे (काका)
सरचिटणीस- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती फलटण