बारामती :
सोमवार दि 26 जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ता tvने ग्रामपंचायत वंजारवाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती आयोजित कोविड योद्धा पुरस्कार वितरण सभारंभ सोहळा ग्रामपंचायत वंजारवाडी कार्यालयात संपन्न झाला
या प्रसंगी तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष
संभाजी होळकर , पंचायत समिती चे गटविकास अधिकारी राहुल काळभोर व ग्रामपंच्यात चे उपसरपंच विनोद दासा चौधर
सदस्य मोहन चौधर व बबन सावंत
,ग्रामसेवक श्री निलेश लव्हटे,
ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते रणजित जगताप अजित चौधर, यशवंत चौधर
यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये डॉक्टर, आशा सेविका,अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कर्मचारी, ड्रायव्हर, अशा 23 कोरोना योद्धा चा सत्कार सन्मानपत्र,शाल व श्रीफळ , गुलाबपुष्प,तसेच ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे कामाची जवाबदारी आता वाढली असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी नियोजन करा व कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आव्हान गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी केले आभार उपसरपंच विनोद चौधर यांनी मानले
——————————–