बारामती:
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय प्लेसमेंट, कौशल्य विकास, बौद्धिक मालमत्ता अधिकार, पेटंट, उद्योजकता व इनक्युबेशन या बाबींवर विशेष परिश्रम घेत असते. २२ जुलै २०२१ रोजी संस्थेचे विश्वस्थ मा. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र संचलित करिअर कट्टा अंतर्गत विद्या प्रतिष्ठान व बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रोजगार आणि उद्यजकतेसाठी संधी’ या विषयावर दूरदृश्यप्रणाली पद्धतीने व्याख्यान आयोजित केले गेले. या व्याख्यानादरम्यान प्रमुख पाहुणे व व्याख्याते मा. यशवंत शितोळे [राज्य समन्वयक, चांगुलपणाची चळवळ व संस्थापक अध्यक्ष – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र] यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर उद्योजकतेचे विविध पैलू विषद केले तसेच करिअर कट्टा अंतर्गत विविध उपक्रमांचा उहापोह केला. सचिव अॅड. निलिमाताई गुजर यांनी मा. यशवंत शितोळे यांनी छेडलेल्या उद्योजकतेच्या या मोहिमेचा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा व पर्यायाने इतरांचाही उत्कर्ष करावा असे आवाहन केले व शुभेच्छा दिल्या. करिअर कट्टाचे विभागीय समन्वयक डॉ. दिनेश हंचाटे यांनी सचिव अॅड. निलिमाताई गुजर, बिमाचे अध्यक्ष मा. धनंजय जामदार, प्राचार्य डॉ. भारत शिंदे, डॉ. राजनकुमार बिचकर, डॉ. राजवीर शास्त्री, डॉ. मधुकर फड, डॉ. संगिता गायकवाड, डॉ. निर्मल साहुजी, प्रा. राजश्री पाटील, डॉ. जोशी, डॉ. मुरुमकर, डॉ. अविनाश जगताप, डॉ. लाहोरी, डॉ. मुकणे यांचे स्वागत केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे सत्र अतिशय उपयुक्त ठरले. उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्रा. दीपक सोनवणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रा. निखील वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालनाची धुरा प्रा. ज्योती भोंग यांनी वाहिली. तांत्रिक विभागाची धुरा प्रा. रोहित पिस्के व श्री. अक्षय कांबळे या विद्यार्थ्याने सांभाळली.
संस्थेचे उपाध्यक्ष अॅड अशोक प्रभुणे, विश्वस्त सौ सुनेत्रा पवार, अॅड नीलिमा गुजर, प्राचार्य डॉ. राजनकुमार बिचकर यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.