बारामती:
तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, बारामती यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्हा क्रीडा संकुल,बारामती व बारामती तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात वेगवेगळ्या खेळांचे मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन कोविडच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संभाजी होळकर अध्यक्ष, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अविनाश लगड जिल्हा क्रीडा संकुल समिती सदस्य, शरदचंद्रजी धारूरकर अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघ पुणे, मिलिंद क्षीरसागर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, शारीरिक शिक्षक महासंघ पुणे, दीपक काटे बारामती बिल्डर्स असोसिएशन, दत्तात्रय बोराडे सचिव लॉन टेनिस असोसिएशन बारामती, सोडमिसे साहेब, पंचनदिकर सर अध्यक्ष, बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशन, संजय संघवी उपाध्यक्ष बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशन, विनायक साखरे,वाहतूक निरीक्षक अधिकारी बारामती तालुका क्रीडा अधिकारी माननीय श्री जगन्नाथ लकडे सर या मान्यवरांच्या शुभहस्ते बारामती तालुक्यातील विविध क्रीडा प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये कबड्डी – दादासो आव्हाड, मोहन कचरे, दत्तात्रय चव्हाण, व्हॉलीबॉल – शिवाजी जाधव बॉक्सिंग – अमर भांडलकर, हिम्मत कौले, लॉनटेनिस- प्रदीप कुंचुर,दत्तात्रय बोराडे, कराटे -रविंद्र करळे, अभिमन्यु इंगोले योगा -महाजन सर बॅडमिंटन -गणेश सपकाळ, तनुजा सपकाळ, जिम ट्रेनर अनिल जगताप, विद्या प्रबोधिनी करिअर अकॅडमी घाडगे सर, माननीय श्री संजय होळकर सर सोमेश्वर विद्यालय मूर्ती, प्राध्यापक लक्ष्मण मिटकरी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती, प्राध्यापक आशोक देवकर टीसी कॉलेज बारामती,श्री अनिल गावडे, श्री दादासाहेब शिंदे म.ए.सो चे कै. ग.भि. देशपांडे विद्यालय बारामती श्री सचिन नाळे, जनहित प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालय बारामती, श्री दीपक नलावडे जेडी गावडे विद्यालय, पारवडी, श्री प्रसाद रणवरे विद्या प्रतिष्ठानचे न्यू बालविकास मंदिर पिंपळी, माननीय श्री सुभाष चव्हाण मेखळी हायस्कूल, तुळजाराम चतुरचंद इंग्लिश मेडीयम स्कूलचे बास्केटबॉल शिक्षक अभि चव्हाण, प्रेमकुमार धर्माधिकारी ( पत्रकार ) इत्यादींचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्यावतीने करण्यात आले या कार्यक्रमासाठी दत्तात्रय बोराडे यांनी गुलाब रोपे दिलेली होती प्रास्ताविक तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले श्री मिलिंद शिरसागर यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व तर माननीय श्री शरदचंद्रजी धारूरकर यांनी बारामतीतील क्रीडा क्षेत्रातील यशस्वी घोडदौड याविषयी गौरवोद्गार काढले संभाजी नाना होळकर यांनी बारामती तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमधील क्रीडाक्षेत्राचा आढावा घेतला व क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच सहकार्य राहील व क्रीडा विकास करण्यासाठी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार नवनवीन क्रीडांगणे व क्रीडा सुविधा उपलब्ध होतील अशी आशा व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार राजेंद्र खोमणे यांनी व्यक्त केले सूत्रसंचलन प्रा.अशोक देवकर यांनी केले.