बारामती :
गोवा येथे 17 ते 19 जुलै रोजी झालेल्या नॅशनल यूथ स्पोर्ट आणि एज्युकेशन इंडिया रजिस्टर बाय खेलो इंडिया आणि फिट इंडिया सपोर्ट बाय एम वाय ए एस गव्हर्मेंट इंडिया यांच्या वतीने जलतरण स्पर्धा घेण्यात आल्या या मध्ये बारामतीच्या वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या च्या जलतरण खेळाडू नी सहा गोल्ड आणि एक बेस्ट जलतरणपटू ट्रॉफी मिळवली .या मध्ये महेश साळुंखे यांना दोन गोल्ड आणि बेस्ट जलतरणपटू ट्रॉफी मिळाली तसेच दादा चव्हाण यांना एक गोल्ड मेडल मिळाले आणि महादेव तावरे यांना गोल्ड मेडल मिळाले तसेच श्रीमंत गायकवाड यांना दोन गोल्ड मेडल मिळावले आहे.सदर खेळाडू ची
25 सप्टेंबर रोजी नेपाळ काठमांडू येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
वीर सावरकर स्वीमर्स क्लब चे अध्यक्ष डॉ अशोक तांबे व जवाहर वाघोलीकर, प्रवीण आहुजा,नानासाहेब शेळके आदींनी अभिनंदन केले.