“मुधोजी हायस्कूल एक गुरू आलय ”
फलटण दि.२३ :
आज गुरूपौर्णिमा गुरूंना वंदन करण्याचा दिवस
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः।।
या निमित्तानं मुधोजी हायस्कूल ने शालेय परंपरेनुसार शिक्षकांच्या उपस्थिती त गुरू पौर्णिमेचे महत्त्व सांगताना शाळेच्या शिक्षकांनी वरील उद् गार काढले.
आजपर्यंत या शाळेतून विविध गुण, कला, ज्ञान आत्मसात करून उच्च पदावर विराजमान होणारे अनेक विद्यार्थ्यी तयार झालेले आहेत आणि याचे श्रेय मुधोजी हायस्कूल मधील शिक्षकांना च द्यावे लागेल शाळेतील विद्यार्थ्यांना घडवून योग्य असा समतोल नागरिक तयार करण्याचा वारसा मुधोजी हायस्कूल च्या शिक्षकांनी जतन केलेला आहे. म्हणून च ही शाळा म्हणजे एक गुरू आलय होय.
”दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती”
या कार्यक्रमाच्या प्रसंगी कोव्हिड- 19 चे सर्व नियम पाळून शाळेचे मुख्याध्यापक श्री गंगवणे सर
उपमुख्याध्यापक श्री ननवरे सर
पर्यवेक्षक श्री गोडसे सर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन श्री वाघ सर यांनी केले. श्री शिंदे सरांनी आभार व्यक्त केले. अशी वार्ता श्री कर्वे सरांनी दिली.
👏👏