फलटण :- नवीन रुग्णवाहिकां लोकार्पण करताना श्रीमंत रामराजे शेजारी श्रीमंत शिवरूपराजे, दता अनपट, आनिल देसाई, प्रा . रमेश आढाव व ईतर मान्यवर
फलटण – प्रतिनिधी :- कोरोना महामारी संकटा दरम्यान वैद्यकीय सोयी सुविधांची गैरसोय होवु नये या पाश्र्वभुमीवर तालुक्यातील आरोग्य विभाग सक्षम करण्याच्या उद्देशाने आपण एक पावुल पुढे टाकले असल्याचे सांगत तालुका आरोग्य विभागाला शासनाच्या सहकार्यातुन जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोगातुन खरेदी केलेल्या ३१पैकी ६ रुग्णवाहिका फलटणला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आगामी काळात तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
राज्य शासनाच्या सहकार्यातुन पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला श्रीमंत रामराजे यांनी उपलब्ध करून दिलेल्या सहा नवीन रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा येथील पंचायत समितीच्या आवारात श्रीमंत रामराजे यांचे हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी आमदार दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा मध्यवर्ती सह . बँकेचे संचालक अनिल देसाई, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूप राजे खर्डेकर, उपसभापती सौ. रेखा ताई खरात, माजी सभापती रेश्माताई भोसले, जि.प. सदस्या उषाताई गावडे, धैर्यशील अनपट, पंचायत समिती सदस्य विमलताई गायकवाड, संजय कापसे, सचिन रणवरे, महानंद उपाध्यक्ष डि .के .पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉं विक्रांत पोटे, विश्वास गावडे, वसंत गायकवाड, सुभाष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील रूग्णांना या रूग्णवाहिकांमुळे दिलासा मिळणार असुन ही मागणी अनेक वर्षाची होती शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३१ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत पैकी फलटण तालुक्याला सहा रूणवाहिका मिळाल्या असल्याने तालुक्यातील रुग्णांना वेळेत उपचार करणे सोयीस्कर होणार आहे परिणामी ग्रामीण भागातील नागरीकांना दिलासा मिळणार असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रारंभी श्रीमंत रामराजे श्रीमंत संजीवराजे व आमदार दिपक चव्हाण, अनिल देसाई यांचे हस्ते रूग्ण वाहिकांचे पुजन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास पंचायत समिती व आरोग्य विभातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.