गुणी प्रतिभावंत गायिका कु.राधा खुडे हिचे अनोख्या पद्धतीने सासकल येथे अभिनंदन व सत्कार समारंभ

 फलटण (प्रतिनिधी):
 वालचंदनगर येथे राहणारी गुणी प्रतिभावंत उभारती गायिका कु.राधा खुडे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कलर्स मराठी दूरचित्रवाहिनीवरील ‘ सूर नवा ध्यास नवा आस उद्याची’ या गीतगायन स्पर्धेत आपल्या गायनाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आणि आपल्या गायनाची झलक सर्वांनाच दाखवली. वालचंदनगर येथे राहणारी राधा खुडे ही अत्यंत गरीब पण स्वाभिमानी कुटुंबात जन्माला आली राधाचे वडील हे दत्तात्रय खुडे हे छोटा मोठा व्यवसाय करतात.आई  शिवणकामासोबत भाजीपाला विकण्याचे काम करते.राधाचे शिक्षण हे वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयात झाले.तिला सुरवातीपासूनच गायनाची आवडी असल्याने तिने जंक्शनजवळील कला महाविद्यालयात कला शिक्षणाचे प्रशिक्षण घेतले.राधाला चंदन कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले. तीचे आज मौजे सासकल ता.फलटण जि.सातारा येथे सासकल जनआंदोलन समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती,सासकल ग्रामपंचायत सासकल व जाणता राजा प्रतिष्ठान,भाडळी बु. यांच्यावतीने अभिनंदन व जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी सासकल जन आंदोलन समितीचे प्रवर्तक व कमला निंबकर बालभवन(प्राथमिक विभाग) चे मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते सोमिनाथ घोरपडे यांनी त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समग्र वाड्मय भाग १ ही पुस्तके देऊन कु. राधा खुडे हिच्या पुढील वाटचालीस व प्रवासास हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी जन आंदोलन समितीचे अध्यक्ष, शिवाजीराव हरिबा मुळीक, प्रमुख संघटक सचिन भीमराव खुडे, विनायक मदने, भानुदास घोरपडे यांनी राधाच्या गायनाचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या.यावेळी सासकल ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन धनाजी घोरपडे, विद्यमान सदस्य व गावाचे माजी सरपंच हणमंतराव मुळीक, जाणता राजा प्रतिष्ठान,भाडळी बु.अध्यक्ष मोहनराव डांगे यांनी  ही सत्कार केला.तसेच सचिन खुडे या परिवाराने राधाचा विशेष सत्कार करून तीच्या गायनाचे कौतुक केले.
यावेळी शिवाजी हरिबा मुळीक, भीमराव पांडुरंग खुडे,अर्जुन पांडुरंग खुडे, नामदेव दगडू खुडे, कुंदन घोरपडे, अरुण सोमनाथ खुडे,मीराताई भीमराव खुडे,विठ्ठल गणपत मुळीक, रोहन घोरपडे,अक्षय सुखदेव घोरपडे, सौरभ शैलेश घोरपडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!