फलटण पूर्व भागात बांधकाम व्यवसाय मध्ये व्यवस्थित रित्या काम करून शासकीय कामांमध्ये आपल्या कामाची चुणूक दाखवून जिल्ह्यामध्ये वेगळी ओळख निर्माण करणारे आसू येथील प्रमोद सदाशिव झांबरे यांची मजूर फेडरेशनच्या चेअरमन पदी निवड झाली.
आसू करांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचे प्रतिपादन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराव माने पाटील यांनी व्यक्त केले. आसू ता.फलटण येथील काळेश्वर मंदिरात नुकतेच मजूर फेडरेशनच्या चेअरमनपदी प्रमोद सदाशिव झांबरे यांची निवड झाल्याबद्दल छोटेखानी सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आसू गावचे सरपंच महादेवराव सकुंडे,उपसरपंच धनंजय घोरपडे, शिवाजीराव माने, आनंदराव माने, अशोक गोडसे, उद्योजक पै.हनुमंतराव फडतरे, विशाल झांबरे, अंकुश काळे, शिंदेनगरचे युवा उद्योजक रोहन शिंदे, आसू ग्रामपंचायत सदस्य मुन्ना शिरतोडे, जमीर महात, तसेच लक्ष्मण चव्हाण, हरिचंद्र सपकाळ, पै.रावसाहेब शिरतोडे, सचिन माने, सचिन पाखरे, राजेंद्र थिटे, उद्योजक बापूराव साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव माने म्हणाले की आसू व परिसरात प्रमोद झांबरे यांच्या रूपाने जिल्ह्यातील मजूर फेडरेशन वर काम करण्याची संधी मिळाल्याने आसू करांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्व भागात तसेच फलटण तालुक्यात इतर ठिकाणी नियोजन पद्धतीने काम करणारे प्रमोद झांबरे हे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या कामाची दखल वरिष्ठ पातली घेतल्याने ही अभिमानास्पद बाब आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रमोद झांबरे म्हणाले की या भागाचे नेते कै.श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांच्या कृपाशीर्वादाने मी या भागात काम करत राहिलो या भागात नियोजनबद्ध काम केल्याने या कामाची पोचपावती मला विधान परिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर,जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाऊ देसाई, प्रकाश बडेकर, यांच्या उपस्थितीत व मजूर फेडरेशनचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या माध्यमातून माझी आज निवड झाल्याने आसू गावातील वरिष्ठांनी केलेला सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रमोद झांबरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले तर आभार आसू ग्रामपंचायतीचे उपसरपंच धनंजय घोरपडे यांनी मानले त्यांच्या निवडीबद्दल सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,पालकमंत्री बाळासाहेब पाटील, श्रीमंत बंटीराजे खर्डेकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद आबा पाटील,आमदार दिपकराव चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सभापती शिवरूपराजे खर्डेकर, जिल्हा बँकेच्या संचालक नितीन काका पाटील, खंडाळ्याचे दत्तानाना ढमाळ तसेच सर्व सातारा जिल्हा बँकेचे संचालक व मजूर फेडरेशनचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यासह सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले.
चौकट
आसू गावातील सुरेश चव्हाण यांची गेल्या महिन्यात मजूर फेडरेशनच्या व्यवस्थापक पदी निवड झाल्याने तसेच आज प्रमोद झांबरे यांची निवड झाल्याने आसू करांसाठी एक अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन असो गावचे प्रगतशील बागायतदार शिवाजीराव शेडगे यांनी केले