सातारा दि.13 (जिमाका): मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे नाव आहे परंतु फोटो नाही असे 262 सातारा मतदारसंघातील 12 हजार 354 मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे फाटो संकलित व वगळणीचे करण्याचे काम माहे जून 2021 केलेले आहे. एनआयसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करुनही मतदान केंद्रस्तीय अधिकारी यांच्याकडे फाटो जमा होत नाहीत. मतदार हे त्या यादीभागात राहत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फोटो संकलित करणे शक्य होत नाही. अशा सर्व मतदार यांनी स्वत:चे फोटो नमुना 8 भरुन आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसील कार्यालय सातारा निवडणूक शाखा यांच्याकडे जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते.
अद्यापही फोटो जमा झालेले नसल्याने मतदार यादीभागात राहत नसल्याचे दिसून आल्याने त्यांचे पंचनामे करण्यात येवून नंबर 7 भरुन घेवून वगळण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. मतदार यादीमधून कोणाचे नाव वगळले असल्यास व याबाबत कोणाचाही आक्षेप असल्यास दोन दिवसात कार्यालयात येवून समक्ष भेटावे व नाव नोंदणी करुन घ्यावी. तद्नंतर केलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीदार यांनी कळविले आहे. फोटो नसलेली मतदार यादी https://www.satara.gov.in/en/