फलटण प्रतिनिधी – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे फलटण शहरातील बाजारपेठ अधिककाळ बंद राहिल्याने व्यापारी , छोटे व्यावसाईक,हातगाडीवाले,वडापाव ,वगैरे तत्सम खाद्यपदार्थ विक्रेते त्याचप्रमाणे या व्यवसायातील खाजगी नोकरदार,रिक्षा,माल वाहतुकीचे वाहनधारक वगैरे सर्व घटकांचे फलटण शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून व्यवसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून इतर जनरल असणाऱ्या व्यापाऱ्यांची कुचंबना होत आहे त्या मुळे सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी असे निवेदन सर्व व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी यांना केली आहे.
सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी साठी फलटणचे प्रांताधिकारी यांना फलटणच्या व्यापाऱ्यांचे निवेदन
फलटण – प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन देताना फलटण चे व्यापारी
मुळातच सध्या फलटण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे,तसेच या व्यावसायिक / दुकानदारांकडे येणारे ग्राहक हे फार कमी प्रमाणात असतात,अत्यावश्यक वस्तू बरोबर इतर विक्री व्यवसायांना प्राधान्य देऊन शासनाने कापड,चप्पल, भांडी , इस्त्रीवाले , हार्डवेअर , ऑटोमोबाईल्स , प्रिंटींग प्रेस या कमी प्रमाणात गर्दी करणारे व्यवसायावर अन्याय केलेला आहे,व्यापारी देणे, बँकचे हप्ते , लाईट बिल , कामगारांचे पगार , घरखर्च यामुळे सर्वसामान्य व्यापारी हतबल झाला आहे.तसेच आर्थिक गर्तेत सापडला आहे.
जिल्हाधिकारी फलटणचे प्रांताधिकारी यांना फलटणच्या व्यापाऱ्यांची विनंती आहे की,आपण त्वरित आपला निर्णय बदलून दुकाने चालू ठेवण्यास आम्हाला परवानगी द्यावी अशी एकमुखी मागणी केली आहे.आम्ही प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करून कोरोना हद्दपार करण्यासाठी कायमथ मदत करत आलो आहोत . यामुळे सोशल डिस्टसिंग , सॅनिटायझर , वेळेचे बंधन पाळून शासनास सहकार्य करू तसेच सर्व स्तरातील व्यापारी यांना कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लस उपलब्ध करून द्यावी . व्यापाऱ्यांना फ्रंटवर काम करावे लागते त्याचबरोबर कामगार वर्ग ही असतो,शासनाला आमची विनंती मान्य करून तात्काळ सहकार्य करावे ही सर्व संघटना असोसिएशन्स , छोटे मोठे व्यावसायिक / दुकानदार यांच्यातर्फे विनंती चे निवेदन देण्यात आले आहे .
आपला निर्णय कळवे पर्यंत आपण कोणतीही कारवाई करून व्यावसायिक / दुकानदार यांना त्रास होऊ देऊ नये अशी मागणी फलटण व्यापाऱ्यांनी केली आहे. यावेळी फलटण तालुका व्यापारी महासंघ फलटण तालुका व्यापारी वेलफेअर असोसिएशन फलटण व्यापारी संघटना फलटण फलटण शहरातील सर्व छोटे मोठे व्यावसायिक व दुकानदार उपस्थित होते.