जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील औद्योगिक वसाहत मधील वंजारवाडी या ग्रामपंच्यात च्या उपसरपंच पदी विनोद दासा चौधर यांची निवड करण्यात आली आहे.
शुक्रवार दि.09 जुलै रोजी तत्कालीन उपसरपंच बबनराव सावंत यांनी राजीनामा दिल्याने सदर जागा रिक्त होती विनोद चौधर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
या वेळी सरपंच किरण जगताप
सदस्य, मोहन चौधर, बबन सावंत ग्रामसेवक निलेश लवटे आणि
नितिन चौधर, रणजित जगताप ,संपत चौधर ,प्रविन चौधर ,बंडू खोगरे ,सचिन चौधर ,बापू चौधर, सौरभ दराडे, समिर चौधर,अजित चौधर आदी मान्यवर उपस्तीत होते.
शासनाच्या विविध योजना तळागाळात पोचविणे व ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे निवडी नंतर उपसरपंच विनोद चौधर यांनी सांगितले
——————————————–