जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
टोकियो येथे होत असलेल्या ऑलम्पिक मध्ये खेळाडू नी देशासाठी पदकाची लयलूट करावी व देशाचे नाव सर्व जगात करावे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे केली.
शनिवार 10 जुलै रोजी शासनाच्या वतीने ऑलिम्पिक साठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूना शुभेच्छा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट चे शुभारंभ व शुभेच्छा च्या बॅनर चे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते करून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या .
या प्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,गटनेते सचिन सातव गटनेता , बारामती बँकेचे व्हा चेअरमन प्रांताधिकारी ,दादासाहेब कांबळे उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक हनुमंत पाटील, ,सा, बा. विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद,बारभाई, उपअभियंता एम व्ही ओहोळ तहसीलदार विजय पाटील, प्रो कबड्डी खेळाडू दादासो आव्हाड आदी उपस्तीत होते या कार्यक्रमाचे नियोजन तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले होते.
खेळाडू चा उत्साह वाढण्यासाठी या नवीन कल्पना घेऊन शुभेच्छा देण्यात आल्याचे तालुका क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सांगितले.
: