फलटण तालुका मराठी पत्रकार परिषद कार्यकारणीची निवडी जाहिर
फलटण तालुका मराठी पत्रकार परिषद कार्यकारणी निवडी प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे , प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, राज्य प्रतिनिधी सुजित आंबेकर, समाधान हेंद्रे, फलटण तालुकाध्यक्ष रमेश आढाव, बापूराव जगताप व इतर मान्यवर
फलटण दि ११: सामान्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारा पत्रकार आज तरुण पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी प्रेरणादायी ठरत असून त्या कार्याची मुहूर्तमेढ मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रात एकतेचा व एकजुटीचा संदेश देणारी असून त्याची सुरुवात पत्रकारितेची पंढरी असलेल्या फलटण मधून होत असल्याचा आनंद फार मोठा असून यापुढे पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे जिल्हा पत्रकार संघ उभा राहील अशी ग्वाही सातारा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांनी दिली ते मराठी पत्रकार परिषदेच्या फलटण तालुका नूतन कार्यकारिणी निवडी प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, राज्य प्रतिनिधी सुजित आंबेकर, समाधान हेंद्रे, ज्येष्ठ पत्रकार फलटण तालुकाध्यक्ष रमेश आढाव, बापूराव जगताप उपस्थित होते.
यावेळी बोलताना हरिष पाटणे म्हणाले की पत्रकार हा समाजातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहोरात्र काम करीत असतात हे काम करत असताना अनेक लोक नाराज होत असतात याची पर्वा न करता आजचा फलटणचा युवा पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एकवाटल्याचे पाहून खरोखरच आनंद वाटला तुमच्या एकीचा संदेश संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातील पत्रकारांना एकजूट होण्याचा दाखवलेला मार्ग हा मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्याला दिपस्तंभ ठरेल त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख व किरण नाईक हे तुम्हा युवा पत्रकारांच्या फलटणकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे मी दोघांच्या वतीने वचन देतो असे हरिष पाटणे यांनी सांगितले.
दरम्यान कोरोना काळात जे पत्रकार मृत्युमुखी पडले त्यासाठी शासन स्तरावरील मदत मिळवून देण्यासाठी मराठी पत्रकार परिषद पुढे येणार असून कोरोना काळात अडचणीत आलेल्या वृत्तपत्राना आर्थिक मदत मिळावी यासाठी लवकरच मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना हरिष पाटणे यांनी सांगितले की धोम-बलकवडीचे पाणी ज्या खंडाळा तालुक्यातून येते ज्या फलटण तालुक्यात पोहोचते या पाण्याचा नक्कीच काहीतरी गुणधर्म असल्यामुळे माझे व फलटण पत्रकारांचे सूत जुळते माझ्या पाठीशी फलटणचे पत्रकार सावलीसारखी उभी राहतात याचा मला अभिमान वाटतो याची उतराई मी कदापि करू शकत नाही माझ्या फलटणच्या पत्रकारांना जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यास समजेल अशा भाषेत उत्तर देण्यासाठी मी सर्वात पुढे असेन असे सांगितले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे म्हणाले की, माझे सहकारी प्रशांत रणवरे यांच्यावर हल्ला व धमकी प्रकार घडला तेव्हा माझ्या सहकार्याच्या पाठीशी फलटणचे सर्व पत्रकार खंबीरपणे उभे राहिले पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही असे समजल्यावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, शरद काटकर, विनोद कुलकर्णी, सुजीत आंबेकर, दीपक प्रभावळकर यांनी जी ठोस भूमिका घेतली व पोलिस प्रशासनास गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. सर्व पत्रकार बंधूनी माझ्या सहकाऱ्याला जो आधार दिला त्याबद्दल मी सर्व पत्रकार मित्रांचे आभार मानतो. पत्रकारांच्या सुखदुखात यापुढे तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर असेल असा शब्द देतो असे स्पष्ट केले.
यावेळी राज्य परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी सांगितले की, फलटणची पत्रकारिता सातारा जिल्ह्याला एक मार्गदर्शक म्हणून पुढे आल्याचे पाहून येणाऱ्या काही दिवसात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची मातृसंस्था असलेले मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकजुटीचा संदेश देईल व आपल्या न्याय हक्कासाठी पुढे सरसावेल असे सांगितले.
प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना फलटण तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश आढाव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत केले तसेच फलटण तालुका मराठी पत्रकार परिषद कार्यकारणीची निवड केली यामध्ये उपाध्यक्ष युवराज पवार, सचिव विक्रम चोरमले, सहसचिव दिपक मदने, खजिनदार अमोल नाळे, प्रसिद्धीप्रमुख सतीश जंगम, संघटक विजय भिसे यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे व सर्व फलटण तालुक्यातील पत्रकार उपस्थितीत जाहीर केल्या.
या निवडी दोन वर्ष करता असल्याचे स्पष्ट करीत ही संघटना दोन वर्षाच्या कालावधी साठी निवडण्यात आल्याचे सांगितले तसेच तरुण पत्रकारांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी माझ्या सर्व सहकारी पत्रकार बंधूंना बरोबर घेऊन फलटणच्या पत्रकारितेला साजेशे काम करून दाखवतील असा विश्वास प्राध्यापक रमेश आढाव यांनी व्यक्त केला.
यावेळी श्रीरंग पवार, दादासाहेब चोरमले, नसीर शिकलगार, सचिन मोरे, सुधीर अहिवळे, रोहित अहिवळे, राजेंद्र भागवत,यशवंत खलाटे, शक्ती भोसले, मयुर देशपांडे, सूर्यकांत निंबाळकर, नानासाहेब मुळीक, अशोक सस्ते, प्रदीप चव्हाण, वैभव गावडे, अजित निकम, अविनाश जाधव, प्रवीण काकडे, उमेश गार्डे, नवनाथ गोवेकर, निलेश सोनवलकर, लखन नाळे, तानाजी भंडलकर, आनंदा पवार, अनिल पिसाळ, शेखर जगताप, बाळासाहेब ननावरे, किसन भोसले, चैतन्य रुद्रभट्टे, रोहन झांजुरणे, शशिकांत सोनवलकर, अनमोल जगताप, विकास अहिवळे, योगेश निकाळजे, श्रीकृष्ण सातव, संजय जामदार, अभिषेक सरगर यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ मंगल कार्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तद्नंतर राज्यात कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश जंगम यांनी केले तर आभार युवराज पवार यांनी मानले
चौकट
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने या वेळी फलटण तालुक्यातील सरडे गावचे सुपुत्र प्रवीण जाधव त्याची तोक्यो ओलंपिक साठी निवड झाल्याबद्दल व शिंदेवाडी तालुका फलटण श्रीराम यादव यांची मंत्रालय सामान्य प्रशासन विभागात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल तसेच गोखळी येथील स्वरा भागवत या कन्येची सायकलिंग व इतर कौशल्य प्रकारात प्राप्त केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनंदन ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.
चौकट
मराठी पत्रकार परिषद फलटण च्या वतीने फलटण तालुक्यातील पत्रकार सदस्यांची दोन लाख रुपयांचा विमा प्रमाणपत्राचे वाटप यावेळी करण्यात आले या उपक्रमाचे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी कौतुक करून विमा पॉलिसी काळाची गरज ओळखून फलटण परिषदेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
Post Views: 26