कुटुंबवत्सल टिटवी पक्षी अशुभ असते का?

टीव… टीव… टीटीव…. टीव असा टाहो फोडणारा टिटवी पक्ष्याचा आवाज आपण खूप वेळा ऐकतो. अजून सुद्धा खूप सारे लोक या पक्ष्याचा आवाज आला की काहीतरी अशुभ बातमी, अशुभ घडणार इत्यादी इत्यादी मानतात. अश्या या टिटवी पक्ष्या बद्दल आज माहिती जाणून घेऊ या.
      टिटवी हा कॅराड्रिले (Charadrilae)या कुळातील पक्षी. भारतासह आशियायी देशामध्ये सापडणारा. संस्कृत मध्ये टिट्टीभ, हिंदी मध्ये तितुरी असे म्हणतात. रक्त आणि पीतमुखी अश्या प्रमुख दोन प्रजाती (redwattled lapwing) अढळतात. या पक्ष्यांचा आधिवास प्रामुख्याने पाणवठयाच्या परिसरात, मोकळ्या माळरान, शेतजमिनीत असतो. नदीकाठी किंवा रानामध्ये खोल खड्डा खाणून दोन-चार दगडगोटे, काही बारीक खडे , काड्या, प्राण्यांच्या लेंड्या असलेले घरटे करून मादी तीन ते चार अंडी घालते. फिकट तपकिरी रंगाच्या अंड्यांवर लहानमोठे काळे डाग आणि ठिपके असतात. अंड्यांचे आणि घरट्याचे  वरील आवरण एकरूप असते. काट्याच्या खड्यांच्या घरट्यात उघड्यावर अंडी घालते. टिटवी हा पक्षी आपल्या पिल्लानंबाबत इतका सतर्क असतो की झाडाच्या पानाची सावली सुद्धा घरट्यावर पडली तरी तो अस्वस्थ होत असतो. कोणी अंड्या कडे जात आहे हे पाहताच तो स्वतः जखमी असल्याचे नाटक करतो आणि स्वतःकडे लक्ष वेधून घेतो. आणि या पक्ष्याचा जोडीदार ती अंडी सुखरूप जागी नेहून ठेवतो. या टिटवी पक्ष्याची पिल्ले पण अगदी जन्मजात त्यांच्या सारखीच वागतात. त्यांच्या पालकांचा ओरडण्याचा धोक्याचा इशारा भेटताच ते जमिनीला इतके एकरूप होऊन जातात, की कुठली माती, दगड आणि पिल्ले हेच कोणला समजत नाही.
   असा हा पक्षी आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी त्याना दक्ष करण्यासाठी आवाज काढतो पण याचाच परिणाम म्हणून त्याला अशुभ नाव दिले गेले.
 *टिटवी पक्षी अशुभ असतो आणि त्याच्या आवाजाने काही तरी अशुभ घडते*?
पूर्वी वेशी बाहेर स्मशाणघाट नदीजवळ असायचा. आणि एखादी व्यक्ती गेल्यावर सर्व विधी, कार्य तेथे पार पाडली जायची. टिटवी चे घरटे हे सुद्धा नदी लगत जवळ पास असायचे, असे काही असले की टिटवी आपल्या पिल्लांचे रक्षण करण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडून आपल्या पिल्लाना, जोडीदारास दक्ष करायची. पण माणसांना दुःखद बातमी आणि टिटवी चा आवाज एकाच वेळी भेटल्याने, मग ज्यावेळी टिटवी ओरडते त्यावेळी दुःखद बातमी समजते असे गृहीत धरले जाऊ लागले. आणि कुटुंबवत्सल टिटवीस अशुभ मानले जाऊ लागले. माणूस एखादी रीती रिवाज, परंपरा डोळे बंद करून पुढच्या पिढीकडे सोपवतो. पण त्या मागची कारणे, असे का? या गोष्टीचा सारासार विचार न करता पुढे पोहचवतात आणि एका निष्पाप जीवास, गोष्टीस, वस्तुस अपशकूनी हा शब्द देऊन मोकळे होतात !!
     ही सर्व माहिती फक्त टिटवी या पक्ष्यास थोडासा न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नसाठी.
धन्यवाद .
धनश्री सावंत
M.Sc B. Ed
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!