फलटण :फलटण तालुक्यातील सरडे या ग्रामीण भागातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल प्रवीण जाधव यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अनेकांच्या कडून कौतुक होत आहे.तसेच प्रवीण जाधव यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कारकिर्दीत सिंहाचा वाटा असणारे त्यांचे गुरू आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री.विकास भुजबळ सर व सौ.शुभांगी भुजबळ मॅडम यांचा फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज गौरव करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या हस्तेही श्री.विकास भुजबळ सर यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तसेच पुढील काळातही फलटण तालुक्यातून आणखीन
ऑलिम्पिक खेळाडू तयार होतील,असे मत श्री.विकास भुजबळ सर यांनी व्यक्त केले.
या सत्कार समारंभ प्रसंगी फलटण तालुका शिक्षक समितीचे नेते धन्यकुमार तारळकर, सरचिटणीस गणेश तांबे,ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदगिरी गोसावी, राजेंद्र पवार, रामचंद्र बागल, प्रसिद्धीप्रमुख निलेश कर्वे तसेच युवा नेतृत्व प्रेमकुमार कांबळे,खंडेराव काळे, गजानन पवार इ. उपस्थित होते.