जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती येथील औदयोगिक क्षेत्रात सर्वात जुनी समजल्या जाणाऱ्या आयएसएमटी लिमिटेड या कंपनीने त्यांच्या कायम कामगारांसाठी नुकताच वेतन करार केलेला असून त्याचा ४१३ कामगारांमा मोठा दिलासा मिळणार आहे
कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातलेले असताना कामगार बंधूनी कंपनीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उत्पादन प्रक्रिया चालू ठेऊन लॉकडाऊनच्या काळातही कंपनीच्या आर्थिक विकासाला हातभार लावलेला आहे कंपनीच्या कठीण काळात कामगारांची भरीव व उत्कृष्ट कार्य प्रणाली कंपनी साठी म्हतपूर्ण असल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री.किशोर भापकर यांनी दिली.
कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांनी चर्चा करून २०२० से २०२४ या कालावधीसाठी रुपये सहा हजार पाचशे ते अकरा हजार चारशे रुपये एवढी वाट जाहीर केलेली आहे. उत्पादन निगडित भत्ता चालू केल्यामुळे दरमहा अंदाजे तीनशे ते नऊशे रुपये वाढ कराराव्यतिरिक्त कामगारांना मिळणार आहे. कामगारांसाठी विमा संरक्षण आर्थिक मदत देणे, कोरोनाग्रस्त कामगार व कंपनीत कामावर येताना जाताना गंभीर अपघात झाला तर दिलासा देण्याचा प्रयत्न या वेतन करारात केलेला आहे व्यवस्थपणाच्या वतीने प्रेसिडेंट ट्युब ऑपरेशन्स भारंबे, बारामती प्लांट हेड, कार्यकारी उपाध्यक्ष श्री.किशोर भापकर, कर्मचारी संबंध अधिकारी श्री.विवेक पवार आणि कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री.कल्याण कदम, जन.सेक्रेटरी श्री.गुरुदेव सरोदे, खजिनदार श्री.संजय जांबले उपाध्यक्ष श्री.बाळासो आटोळे, सल्लागार श्री सुहास शिंदे, श्री हेमंत सोनवणे , सदस्य श्री.उमाजी भिलारे , श्री.संतोष साळवे, नवले यांनी सदरचा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले . .
या कामगारांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.


