जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आणि सर्वात विश्वासार्ह सेवा प्रदाता संस्था म्हणून पीसीएस फॅसिलिटी सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ओळखली जाते हे श्रेय कर्मचाऱ्यांचे आहे असे प्रतिपादन पी सी एस फॅसिलिटी सर्विसेस चे व्यवस्थापकीय संचालक सरफराज शेख यांनी केले.
कंपनीच्या वर्धापन दीना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
हाऊसकिपिंग, सपोर्ट सर्विसेस, पेस्ट कंट्रोल, टेक्निकल सर्व्हिसेस, सेक्युरिटी सर्विसेस (सुरक्षा रक्षक)अशा अनेक सेवा व उत्कृष्ट सेवा व्यवस्थापन व गुणवत्ता मानक हे या संस्थेची वैशिष्ट्ये असून राज्यात व बाहेर सुद्धा विविध क्षेत्रांमध्ये सेवा व्यवस्थापनाचे काम सुरू असून या माध्यमातून जवळपास सातशे लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे असे सह-संचालक अफरोज शेख, यांनी सांगितले.
कोरोना महामारी च्या संकटामुळे हा पाचवा वर्धापन दिवस अगदी साधेपणाने व सोशल डिस्टन्स ठेऊन साजरा करण्यात आला.
सह-संचालक अफरोज शेख,मानव संसाधन प्रमुख इनासिओ परेरा , रिजनल व्यवस्थापक नितीन शहा व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
–—————————————