बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती मधील विविध धावण्याच्या स्पर्धे मधून लता करे आजी यांनी स्पर्धा जिंकून अवघ्या महाराष्ट्राला आपली दखल घेण्यास भाग पाडले पण त्यामागील त्यांचा संघर्ष सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेला . नुकताच लता करे यांनी इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा संघर्ष ऐकून गायिका सोनू कक्कर यांनी १ लाख २१ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली . बारामती येथील लता करे २०१३मध्ये बारामती शहरातील स्पर्धेत धावल्या होत्या . लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या
हदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. बारामतीमधील रुग्णालयात करोनाचे उपचार सुरू असताना त्यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले. पतीच्या उपचारासाठी वयाच्या ६४व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र त्यांचे मोठे कौतुक झाले. त्यानंतर सलग ३ वर्षे त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्टिक . पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणान्या वयातील जिद आणि यश पाहून त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील
काढण्यात आला आहे. लता भगवान करे , एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. इंडीयन आयडॉल हा गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये देशभरातून स्पर्धक सहभागी झाले असून, या मध्ये गायिका सोनू कक्कर, हिमेश रेशमिया, अनु मलिक जज्ज म्हणून काम पाहत आहे. तर आदित्य नारायण कार्यक्रमाचे होस्ट म्हणून काम पाहत आहेत .
फोटो : लता करे ( संग्रहित फोटो)