स्पोर्ट लायब्ररी चा शुभारंभ करताना मान्यवर
बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळाडू साठी खेळातील विविध पुस्तके वाचण्यासाठी मिळावीत म्हणून स्पोर्ट लायब्ररी जागतिक ऑलम्पिक डे निमित्त सुरू करण्यात आली.
बारामती चे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या शुभहस्ते ऑलम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले या प्रसंगी
आयर्न मॅन सतीश ननावरे,बारामती तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे,फलटण तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, पत्रकार अनिल सावळेपाटील,मंगेश धर्माधिकारी,विद्या प्रतिष्ठानचे क्रीडा विभागाचे प्राध्यापक लक्ष्मण मेटकरी,बारामती कराटेचे रविंद्र करळे,अभिमन्यू इंगुले,खेलो इंडिया प्लयेर घडविणारे व्हॉलीबॉल कोच शिवाजी जाधव,प्रो कब्बडी खेळाडू दादासो आव्हाड,कुस्ती मार्गदर्शक विठ्ठल जाधव,बॅडमिंटन कोच गणेश सपकाळ,जिम कोच अनिल जगताप व सर्व खेळाडू उपस्तीत होते.
कार्यक्रम सुरू होण्या पूर्वी धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्पोर्ट लायब्ररी च्या माध्यमातून खेळाडूंना सर्व मान्यवर खेळाडू,प्रशिक्षक यांचे अनुभव मिळणार असल्याचे क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सांगितले.
बारामती मध्ये सर्व सुविधा असताना जिद्द व आत्मीवश्वास च्या जोरावर खेळाडूंनी ऑलम्पिक पदक जिंकून शरद पवार साहेबाची इच्छा पूर्ण करावी असे मान्यवरांनी सांगितले.
आभार रविंद कराळे यांनी मानले