गोखळी ( प्रतिनिधी) :
कोरोना संसर्ग साथीच्या काळात कोरोना बाधितांना आधार धीर देणे गरजेचे होते या काळात तिरंगा फाऊंडेशनचे संचलित डॉ.बुधाजीराव मुळीक कोरोना सेंटर उभारून अडचणीच्या काळात कौतुकास्पद काम केले आहे असे प्रतिपादन डॉ.बुधाजीराव मुळीक यांनी केले.
तिरंगा फाउंडेशन संचलित डॉ बुधाजीराव मुळीक कोरोना सेंटरला डॉ.बुधाजीराव मुळीक यांनी भेट दिली यावेळी डॉ.मुळीक बोलत होते.यावेळी उद्योजक हणमंत अप्पा मोहिते, भूमाता शेतकरी संघटनेचे नेते धर्माअप्पा जगदाळे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष पै. बजरंग गावडे उद्योजक सुरेश काका पवार, प्रशांत जगताप, बारामती लाईफ लाईन चे डॉक्टर सचिन घोरपडे गोळेवाडी कोरेगाव सरपंच शंकर गोरे पाटील डॉक्टर बाबासाहेब माने डॉक्टर रोहित शिंदे आदी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांनी शेती विषयी मार्गदर्शन केले. यावेळी कोरोना सेंटर साठी सरळ असते वस्तू रूपाने मदत करणाऱ्या दातांचा डॉक्टर मुळीक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . 25 मे रोजी सुरू झालेल्या या करुणा सेंटरमध्ये आज पर्यंत 137 रुग्ण बरे होऊन त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने झाड देऊन निरोप देण्यात आला सध्या सेंटरमध्ये 34 रुग्ण उपचार घेत आहेत.या कोरोना विलिनीकरण कक्षातील रूग्णांना तिरंगा फाउंडेशन कडून दोन वेळेचे जेवणं, चहा नाष्टा दिला जातो.रूग्णाची आरोग्य तपासणी डॉ.अमोल चांदगुडे, डॉ. इंद्रजीत भोसले डॉक्टर बाबासाहेब माने डॉक्टर रोहित शिंदे डॉक्टर गणेश निकम यांनी सेवा देत आहेत. रुग्णसेवेसाठी सहा परिचारिका दोन वार्ड बॉय कार्यरत आहेत. विलगीकरण पूर्णपणे मोफत करण्यात आले . कोरोना रूग्ण अद्याप विलिनीकरण कक्षात दाखल होत आहेत.हे काम किती काळ चालेल हे सांगता येत नाही दानशूनी आपल्या कुवतीनुसार सढळ दिलेली मदत स्विकारली जाईल. या सेंटर साठी रुग्णांना ऑक्सिजन लागला तर तेवढाच चार्ज आकारण्यात येई असे तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकरी संघटनेचे प्रमोद गाडे यांनी केले आभार धनंजय पवार यांनी मानले.