सांगवी दि 22 :
शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी जमिनीचे आरोग्य व जमिन आरोग्य प्रत्रिकेनुसार खतांचा संतुलीत वापर, बीजप्रक्रिया, रुंद वरंबा सरी लागवड तंत्रज्ञान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, विकेल ते पिकेल अभियान यावर शेतकऱ्यांनी भर देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विजयकुमार राऊत कृषी उपसंचालक, सातारा यांनी केले.
सांगवी ता.फलटण येथे कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत तंत्रज्ञान प्रसारासाठी विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, शर्मिलाताई जगताप उपसरपंच सांगवी, पोपटराव जाधव संचालक, श्रीराम जवाहर सह. साखर कारखाना, चांगदेव खरात संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती फलटण, कृषि पर्यवेक्षक सावता टिळेकर, कृषि सहाय्यक तृप्ती शिंदे, दिक्षा एकळ ग्रामपंचायत सदस्य श्री.पोपट बाबूराव जाधव, किसन खरात, मच्छींद्र निकम, संदिप ठोंबरे, संजय करचे, नवनाथ गुंजवटे तसेच प्रगतीशील शेतकरी सागर रुद्रभटे, बाबासो वाघमोडे, संपत जाधव, पोपट गायकवाड, मारुती शिर्के, संदीप पिंगळे दत्तात्रेय ननावरे, तुकाराम शिंगाडे, दिपक फडतरे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.राऊत पुढे म्हणाले की यशस्वी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी हरित क्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून गतवर्षीप्रमाणे कृषी संजीवनी मोहीम २१ जून ते १ जुलै या कालावधीत राबवित असून या द्वारे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, कृषी विभाग जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ, कृषी मित्र वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत असतात. या कृषी विभागाच्या उपक्रमांचा नियोजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले.
उपविभागीय कृषी अधिकारी फलटण भास्कर कोळेकर यांनी जमीनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर आणि महाडीबीटी पोर्टल या ऑनलाइन कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी मच्छिंद्र निकम यांच्या शेतावर फळझाडे लागवड व मोगरा पीक पहाणीचे आयोजन कृषी सहाय्यक संध्या लोणकर व प्रतिक्षा दराडे यांनी केले तसेच महेश आडके यांच्या शेतावर बीज प्रक्रिया व पेरणी प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषि सहाय्यक सागर पवार व चंद्रकांत मंडलीक यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी विडणी अमोल सपकाळ यांनी केले. कृषी सहाय्यक योगेश भोंगळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर कृषी पर्यवेक्षक अंकुश इंगळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.