फलटण :- जिंती ता.फलटण गावचे पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू माफियानी जीवे मारण्याची धमकी व शिविगाळ करूनही पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत फलटण पोलीसांच्या निष्क्रियतेमुळे फलटण येथे गुन्हा दाखल न झाल्याने जिल्ह्यासह फलटण तालुक्यातील पत्रकार यांनी कडक भूमिका घेतल्याने अखेर वाळू माफियांवर फिर्यादी प्रशांत रणवरे यांचा सातारा येथे पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 19 रोजी जिंती गावचे पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू माफियांनी जीवे मारण्याची धमकी व शिविगाळ केल्याची घटना घडल्यानंतर पत्रकार प्रशांत रणवरे ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले असता पोलिस कर्मचारी यांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करता फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला.यानंतर फलटण शहर व तालुका पत्रकार यांनी या घटनेच्या निषेधार्थ एकत्रित येत या घटनेचा निषेध करून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात एकत्रित येत संबंधित आरोपीच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी उपस्थित पत्रकार यांना गुन्हा दाखल करता येत नाही अशी भूमिका घेतली.
यानंतर दिनांक 21 रोजी व्यथीत होऊन पत्रकार प्रशांत रणवरे यांनी त्या वाळूमाफियांवर जर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला जात नसल्याने मला सुसाईड करण्याशिवाय पर्याय नाही, या सर्व प्रकाराला उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व पोलिस निरीक्षक नितीन सावंत हे जबाबदार राहील, अश्या आशयाची वॉट्सअप्पवर पोस्ट टाकली.
पत्रकार प्रशांत रणवरे यांच्या वरील पोस्टमुळे एकच खळबळ उडाली या घटनेनंतर फलटण शहर व तालुका पत्रकार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांची भेट घेतली यावेळी सर्व पत्रकार यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी मागील दोन दिवस पत्रकार प्रशांत रणवरे यांचा दखलपात्र गुन्हा करण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे ही वेळ पत्रकार यांच्यावर आणल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनीही कायदेशीर सल्ला घेतल्या शिवाय या घटनेबाबत गुन्हा दाखल करता येत नाही अशी बाब
संघटनेच्या पदाधिकारी यांना सांगितल्या नंतर पोलिस अधिकारी यांनी कायद्याची पळवाटा न काढता याप्रकरणी कठोर कारवाई न केल्यास पत्रकारांच्या रोषाला समोर जावे लागेल असे यावेळी पत्रकारांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांना सविस्तर माहिती दिल्यानंतर सातारा पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यामध्ये सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी,सातारा जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमूख दिपक शिंदे, इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकार संघाचे तुषार तपासे, जिल्हा निमंत्रक सनी शिंदे,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक सुजित आंबेकर, राहूल तपासे,ओंकार कदम,संतोष नलवडे,अमित वाघमारे,समाधान हेन्द्रे, यांनी एकत्र येत तत्काळ दखल घेत अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली तसेच जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांच्याशी फोनवरून व तत्काळ आरोपी वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करण्याची मागणी केली. यानंतर अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार प्रशांत रणवरे यांना फोनवर संपर्क साधत घटनेची सविस्तर माहिती घेत सातारा येथे येऊन गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेतली.
यानंतर फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार रमेश आढाव, सुभाष भांबुरे, नसीर शिकलगार, यशवत खलाटे,दादासाहेब चोरमले, बाळासाहेब ननावरे, युवराज पवार, शक्ती भोसले, विक्रम चोरमले, चैतन्य रुद्रभटे, प्रसन्न रुद्रभटे, सुधीर अहिवळे, सतीश कर्वे, मयूर देशपांडे, दीपक मदने,किरण बोळे, सदाशिव मोहिते, अमोल नाळे, रोहित अहिवळे, विकास आहिवळे, शेखर जगताप, अजित निकम, वैभव गावडे, अनमोल जगताप, अमिरभाई शेख, संजय गायकवाड व ईतर पत्रकार तसेच ॲडव्हकेट नरसिंह निकम यांनी पत्रकार प्रशात रणवरे यांना बरोबर घेऊन सातारा येथे जिल्हा पोलीस अधिक्षक अजय बन्सल व अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांची भेट घेतली व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व
ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्याबाबत या घटनेच्या सदर्भात तक्रारीचा पाढा वाचला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत घटनेची माहिती घेतल्यानंतर सातारा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात झिरो नंबरने पत्रकार प्रशांत रणवरे पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत अखेर सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या मागणीला न्याय देण्यात आला व आरोपी प्रमोद रणवरे यास तत्काळ अटक करण्यात आली.
“खमक्या जिल्हाध्यक्षामुळे पत्रकारांला न्याय”
फलटण तालुक्यातील पत्रकार प्रशांत रणवरे याच्यावर झालेल्या अन्यायामुळे सातारा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी घेतलेल्या निर्भीड भूमिकेमुळे अखेर पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे मराठी पत्रकार परिषदेतच्या जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे यांचे न्याय देणारे आक्रमक नेतृत्व सिद्ध झाल्याने पत्रकारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Post Views: 62