जिजाऊ भवन मध्ये योग दिन साजरा करताना महिला (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती :
आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त (सोमवार दि.21 जून ) शहरातील जिजाऊ भवन येथे पहाटे साडेपाच वाजता शहरातील महिला एकत्र आल्या आणि सूर्यनमस्काराने सुरुवात करून सामूहिक सूर्यनमस्कार करताना महिलांनी 2021 सूर्यनमस्कार पूर्ण केले आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचे आरोग्य संतुलित करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन आणि तो संकल्प आज पूर्ण केला.
बारामतीतील ओजस्वी योगसाधना ग्रुपच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. योग प्रशिक्षक सोनाली ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साजरा करण्यात आला. अशा प्रकारचा हा फक्त महिलांनी एकत्र येऊन सूर्यनमस्कार करण्याचा पहिलाच प्रयोग होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचे मानसिक स्वास्थ आणि शारीरिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी त्या कुटुंबातील महिलांचे आरोग्य संतुलित असण्याची आवश्यकता आहे म्हणूनच महिलांना दिशा देण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती चे महत्व पटवून देण्यासाठी बारामतीतील महिलांनी हा संकल्प केला होता अशी माहिती बारामतीतील ट्रेकर्स च्या संचालिका योगिता काळोखे यांनी दिली.
जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. हा योग दिन साजरा करत असताना ग्रामीण भागामध्ये बहुतांश ठिकाणी योग साधना पुरुषांचे काम आहे असे समजले जाते. परंतु कुटुंबातील महिलेचे आरोग्य व्यवस्थित असेल, तर त्या कुटुंबाचे आरोग्य व्यवस्थित असते, म्हणूनच या पुढील काळात देखील महिलांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत असे सोनाली ठवरे यांनी सांगितले.
य प्रसंगी कोरोनाचे नियम पाळून महिला मोठ्या संख्येने उपस्तीत होत्या