बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेची आर एन आगरवाल टेक्निकल विद्यालय ही शाळा आज 14 जून 2021 पासून ऑनलाईन सुरू झाली.कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पासून शाळा ह्या ऑनलाईन च्या माध्यमातून सुरू आहेत.रयत शिक्षण संस्थेने यासाठी रयत ऑनलाइन स्कुल एज्युकेशन हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला आहे.या ऑनलाईन प्रकल्पातर्गत रोज सकाळी इ 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थाना अभ्यासक्रमात ठरवून दिलेल्या एका विषयाची लिंक येते व त्याव्दारे विद्यार्थी त्या घटकांचा अभ्यास करतात.त्यानंतर सकाळ सत्रात सकाळी 7 ते 10 पर्यंत इ 8 वी ते 10 च्या वर्गांचे ऑनलाईन अध्यापन केले जाते.त्यानंतर दुपार सत्रात इ 5 वी शिष्यवृत्ती, इ 8 वी शिष्यवृत्ती, नवोदय,रयत प्रज्ञा शोध परीक्षा, एन एम एम एस परीक्षा, एन टी एस परीक्षा अश्या स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन अध्यापन केले जाणार आहे.तर संध्याकाळच्या सत्रात संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत इ 5 वी ते 7 वी पर्यंत वर्गांना अध्यापन केले जाणार आहे.या सर्व प्रकल्पाची सुरुवात आज सोमवार दि 14 जून सकाळी 7 वाजता 10 च्या ऑनलाईन अध्यापणाने झाली.
या ऑनलाईन अध्यापन व प्रकल्पाबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.तसेच जे विद्यार्थी या ऑनलाईन प्रकल्पात मोबाईल वाचून सहभागी होऊ शकले नाहीत अशासाठी मोबाईल बँक हा उपक्रम राबविला जात आहे.यासाठी विद्यालयाचे प्रा.श्री राजेंद्र काकडे,उपमुख्याध्यापक श्री अर्जुन मोहिते,पर्यवेक्षक श्री विष्णू बाबर,रयत शिक्षण संस्थेचे समन्वय समिती सदस्य व आजीव सभासद श्री बंडू पवार,रयत बँकेचे मा. चेअरमन श्री अर्जुन मलगुंडे यांनी पालकांना आवाहन केले आहे की, विद्यालयाला देणगी म्हणून मोबाईल अश्या विद्यार्थ्यांना द्यावा ज्यायोगे सर्व विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी होतील.